४० आमदारांनी शिवसेनेत केलेल्या बंडानंतर आता शिंदे गटाकडून पक्षावरच दावा करण्यात आला आहे. याचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरु आहे. त्यात निवडणूक आयोगाने शिवसेनेचं ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं आहे. पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. यावरूनच अपक्ष आमदार रवी राणांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

रवी राणा प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, “आम्ही मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, उद्धव ठाकरेंनी पोलिसांच्या माध्यमातून आमच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत कारागृहात टाकले. हनुमान चालीसेला विरोध केल्यामुळेच प्रभू श्री रामांनी उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण चिन्ह हिसकावून घेतलं,” अशी टीका रवी राणांनी केली आहे.

हेही वाचा – बाळासाहेब आणि त्रिशूळ… दोघांचीही एकच मागणी; शिंदे आणि ठाकरे पुन्हा आमने-सामने

केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयाविरोधात शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. आयोगाने आम्हाला आमची बाजू मांडण्याची संधी दिली नसल्याचं याचिकेत शिवसेनेने म्हटलं आहे. 

हेही वाचा – “निकाल आपल्या बाजूनं दिला तर उत्तम अन्यथा…”, आयोगावर टीका करणाऱ्या शिवसेनेला फडणवीसांचे प्रत्युत्तर

दरम्यान, शिवसेनेने ‘धनुष्यबाण’ गोठवल्यावर उगवता सूर्य, त्रिशूळ आणि मशाल या चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर सोमवारी शिंदे गटानेही उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी निवडणूक आयोगाकडे केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे शिंदे गट ठाकरेंची कोंडी करण्यासाठी एकही संधी सोडत नसल्याचं दिसत आहे.

Story img Loader