Uddhav Thackeray : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सध्या दिल्लीत सुरु आहे. मराठी साहित्य संमेलनात ‘असे घडलो आम्ही’ या कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोठा आरोप केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं, असा खळबळजनक विधान नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. नीलम गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मात्र याबाबत उद्धव ठाकरेंना विचारलं असता त्यांनी या आरोपांना उत्तर दिलं आहे.

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

काँग्रेस नेते किरण काळे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. आज गाडगेबाबांचं स्मरण केलं पाहिजे. धर्म जगायचा असतो. सांगायचा नसतो, असं गाडगेबाबा नेहमी सांगायचे. शिवाजी महाराजांनीही दुसऱ्यांचा द्वेष करायला नाही सांगितलं. ज्यांनी धर्माचा खेळखंडोबा केला आहे, त्यांचं मुस्लिम प्रेम कसं आहे. हे मी सांगू शकतो. थोरले की धाकले बंधूंबद्दल मोदींनी आपुलकीने ट्विट केलं आहे. भाजप निवडणुकीपुरती धर्मांधता माजवत आहे. हे देशासाठी योग्य नाही, असं सांगतानाच माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंचं रक्षण करणं हे यांचं हिंदुत्व आहे का?

नीलम गोऱ्हेंच्या आरोपांबाबत काय म्हणाले उद्धव ठाकरे?

दाखवा ना मला मर्सिडिज कुठे आहेत? हे असले गयेगुजरे लोक आहेत त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. महिला म्हणून त्यांच्याविषयी मला आदर आहे. राजकारणात त्यांनी चांगभलं केलं आहे. ते तसंच रहावं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना उत्तर दिलं आहे. तसंच स्वतः मर्सिडिजमधून फिरतात मग लाडक्या बहिणींना पैसे का मिळत नाहीत? हे त्या का बघत नाहीत? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी नीलम गोऱ्हेंना विचारला आहे. तसंच संजय राऊत यांनीही नीलम गोऱ्हेंना सवाल केला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

संजय राऊत यावेळी म्हणाले की जर नीलम गोऱ्हेंना उद्धव ठाकरेंनी चारवेळा आमदार केलं आहे तर मग त्यांनी उद्धव ठाकरेंना आठ मर्सिडिज दिल्या आहेत का? त्या दिल्या असतील तर त्याच्या पावत्या वगैरे घेऊन याव्यात त्यांनी. असं म्हणत संजय राऊत यांनी नीलम गोऱ्हेंना टोला लगावला आहे.

नेमकं नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं होतं?

कुठल्याही कार्यकर्त्याला कमी लेखण्याचं काही कारण नाही. २०१२ वगैरे पर्यंत मी पाहात आले आहे की शिवाजी पार्क येथे होणाऱ्या सभा, मेळाव्यांना एकनाथ शिंदे यांचेच कार्यकर्ते गर्दी करायचे. दुसरा भाग असा की संपर्क नको असेल नेत्यांना तर तिथे आपण राहण्यात काही अर्थ नाही. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे.

Story img Loader