शिवसेना ( ठाकरे गट ) आणि समाजवादी विचारांची बैठक आज ( १५ ऑक्टोबर ) पार पडली. यावेळी बोलताना शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावर सडकून टीका केली आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळांडूवर फुलांचा वर्षाव भाजपाकडून करण्यात आला. मग, मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का? तुम्हाला गाडण्यासाठी आमच्यातील मतभेद गाडून टाकले आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उद्धव ठाकरे म्हणाले, “शिवसेना आणि भाजपाची युती तोडण्याचं कारण काय होतं? आता शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र आल्यानं सवाल उपस्थित केले जातील. जर, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पाकिस्तानी खेळांडूवर भाजपा फुलांचा वर्षांव करत असेल मग, मी शिवसेना म्हणून समाजवाद्यांशी बोलू शकत नाही का? तुम्हाला गाडण्यासाठी आमच्यातील मतभेद गाडून टाकले आहेत. काय बोलता बोला?”

हेही वाचा : नितीश कुमारांची बदलती भूमिका; जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव, कुशवाहा यांच्यासह ११ नेत्यांनी आजवर पक्ष सोडला

“संयुक्त महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य चळवळीत संघ कुठं होता? या दोन्ही चळवळीत कुठेही संघ नव्हता. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत जनसंघ होता. य.दी फडकेंनी लिहिलंय की, ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत आचार्य आत्रे, प्रबोधनकार ठाकरे, श्रीपाद डांगे आणि सर्व पक्ष एकत्र आले होते. तेव्हा, संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन झाली. त्यात जनसंघ घुसला होता. कारण, समितीबरोबर राहून काही जागा लढवता येतील.’ तेच, भाजपानं आमच्याबरोबर केलं.”

हेही वाचा : “देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रवादीबरोबर जाण्याची इच्छा नसेल, पण…”, बच्चू कडूंचा टोला

“शिवसेनेनं १९८७ साली देशातील पहिली पोटनिवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जिंकली होती. तेव्हा, भाजपा काय करता होता? हिंदू मते बरोबर आल्यावर निवडणूक जिंकू शकतो, हे भाजपाला कळलं. त्यानंतर भाजपानं शिवसेनेबरोबर युती केली. आता भाजपा एवढी मोठी झालीय की, त्यांना कुणाची गरज वाटत नाही. ही वृत्ती घातक आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray attacks bjp over narendra modi stadium pakistan match ssa
Show comments