कल्याण-डोबिंवली लोकसभा मतदारसंघ हा भगव्याचा बालेकिल्ला राहिला आहे. पण, भगव्याशी गद्दारी करणाऱ्यांना गाडणारा हा मतदारसंघ आहे, असा हल्लाबोल शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराण्यावर बोलू नये, असा इशारही उद्धव ठाकरेंनी दिला आहे. ते अंबरनाथ येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते

उद्धव ठाकरे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत घराणेशाहीवर बोलले आहेत. पंतप्रधानांनी घराण्यावर बोलू नये. तुम्ही आमच्या घराण्यावर बोलाल, तर आम्हीही तुमच्या घराण्यावर बोलू. घरांदाज असलेल्यांनी घराणेशाहीवर बोलावं. घरंदाज नसलेल्यांनी घराणेशाहीवर बोलू नये. घराण्याची परंपरा काय असते, हे मोदींना माहिती नाही. त्यामुळे आजपर्यंत मदत करत आलेली ठाकरेंची घराणेशाही मोदींना नकोशी झाली आहे.”

Amol Khatal Sangamner, Amol Khatal of Shivsena,
अहमदनगर : संगमनेरमधून माजी मंत्री आमदार थोरात यांच्या विरोधात शिवसेनेचे अमोल खताळ
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
amit thackeray vs aadityathackeray maharashtra assembly election
‘राजपुत्रा’ची ‘उद्धवपुत्रा’वर थेट टीका; अमित ठाकरे म्हणाले, “तुम्ही लोकप्रतिनिधी असाल…”
Eknath Shinde Criticized Uddhav Thackeray
Eknath Shinde : “मुख्यमंत्री करा म्हणत ते दारोदारी भटकत आहेत, त्यांचा चेहरा मित्रपक्षांनाही..”, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
thackeray group nominated Kedar Dighe against CM Eknath Shinde in Kopri Pachapkhadi
मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे, ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर
Maharashtra elections
अमित ठाकरेंविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून महेश सावंत यांना उमदेवारी; माहीममध्ये होणार तिरंगी लढतं!

हेही वाचा : “घराणेशाहीमुळे देशाचं नुकसान”, पंतप्रधानांच्या विधानावर उद्धव ठाकरे प्रत्युत्तर देत म्हणाले, “घरंदाज माणसानं…”

“कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांची घराणेशाही गाडायची”

“आता गद्दरांची घराणेशाही मोदींना प्राणप्रिय वाटू लागली आहे. पण, कल्याण-डोबिंवलीतील गद्दारांची घराणेशाही गाडायची आहे. गद्दारी आणि घराणेशाही लोकसभेत नाही तर विधानसभेतही गाडावी लागणार आहे. काहींना कल्याण लोकसभा मतदारसंघ बापाची जहागिरी वाटते. कारण, निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून घराणेशाहीला उमेदवारी दिली. ही चूक माझी आहे. पण, मी केलेली चूक शिवसैनिकांनी सुधरायची आहे. मीही सुधारणार आहे,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे श्रीकांत शिंदेंवर टीकास्र डागलं आहे.

हेही वाचा : “पंतप्रधान गद्दारांच्या घराणेशाहीवर बोलले नाहीत”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री प्रत्युत्तर देत म्हणाले…

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?

“घराणेशाहीच्या राजकारणामुळे देशाचं अरपिमित नुकसान झालं आहे. घराणेशाहीच्या राजकारणाचा प्रभाव कमी करण्यासाठी देशातील युवकांनी सक्रिय राजकारणात सहभागी व्हावं,” असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी ( १२ जानेवारी ) केलं होतं.