ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’साठी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीतून उद्धव ठाकरे यांनी भाजपासह शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. राज्यातील सरकार ट्रिपल इंजिन सरकार आहे की डालड्याचा डबा, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीकास्र सोडलं आहे. यावर आता भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरे यांना अचानक मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल्याने त्यांचं मानसिक खच्चीकरण झालंय, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

Raj Thackeray Uddhav Thackeray (1)
Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
aditya thackeray criticized raj thackeray
“भाजपाचा मुख्यमंत्री बसावा असं स्वप्न बघणारे…”; आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका!
joe biden elon musk
Video: “मला ‘गे’ म्हणाले नी आता पार्श्वभागावर ‘चापट’ मारायचीय”, जो बायडेन यांची एलॉन ‘मस्क’री!
Raj Thackeray on Viral Video
Raj Thackeray : “लोकांच्या मनोरंजनाकरता बाई भोजपुरी गाण्यावर नाचतेय”, ‘त्या’ व्हायरल VIDEO वर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया!
Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…

हेही वाचा- “खेकड्यांना सांभाळलं असतं तर…”, उद्धव ठाकरेंच्या टीकेवर गुलाबराव पाटलांचा टोला

मुलाखतीतून उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना गोपीचंद पडळकर म्हणाले, “महाराष्ट्रातलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. लोकांच्या हिताचे निर्णय सरकारकडून घेतले जात आहेत. उद्धव ठाकरेंना अचानक मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागल्याने त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं आहे. त्यांचे जवळचे सगळे सहकारी त्यांना सोडून गेले आहेत. दर दोन-चार दिवसाला कोणता ना कोणता सहकारी त्यांची साथ सोडतोय. त्यामुळे त्यांची मानसिकता आपण समजू शकतो. त्यामुळे आता त्यांच्या बोलण्याला फार महत्त्व राहिलंय, असं मला वाटत नाही.”

हेही वाचा- “… आता खेकड्यांनीच चमत्कार केलाय”, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला शिंदे गटाच्या आमदाराचं प्रत्युत्तर

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत जाऊन मुजरा करतात. मुजरेगिरीचं सरकार महाराष्ट्राला काहीही देऊ शकत नाही”, उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर गोपीचंद पडळकर म्हणाले, “देशाची राजधानी दिल्ली आहे. केंद्र सरकाराचा कारभार दिल्लीतून चालतो. पक्षाचे वरिष्ठ नेते दिल्लीत असतात. त्यामुळे दिल्लीला जाण्यात गैर काय आहे? तुम्ही दिल्लीत जात नव्हते. तुम्ही केंद्र सरकारकडे जात नव्हता. महाराष्ट्रासाठी निधी मागत नव्हता. त्यामुळे महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान झालं आहे. महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाऊन केंद्र सरकारकडून निधी मिळवतायत. त्यामुळे अशी विधानं करण्याला काहीही अर्थ नाही.”