शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाराष्ट्रातलं उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यानंतर काही महिन्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाची आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी २३ जानेवारी २०२३ रोजी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या युतीची घोषणा केली. उद्धव ठाकरे यांची प्रकाश आंबेडकरांबरोबर युती असली तरी त्यांचा पक्ष महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीबरोबर आहे. परंतु, प्रकाश आंबेडकर हे मात्र मविआ आणि इंडिया आघाडीपासून अलिप्त आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीबाबत वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, इंडिया आघाडीची उद्या आणि परवा (३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर) मुबईत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला देशभरातील २८ पक्षांचे नेते, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत. महाविकास आघाडी या बैठकीचं आयोजन करत आहे. मुंबईतल्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. या पत्रकार परिषदेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण, आमदार नाना पटोले, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार जयंत पाटील उपस्थित होते.

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
BJP leader and MLA Rahul Narvekar elected unopposed as the Speaker of the Legislative Assembly
Rahul Narwekar : नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी फेरनिवड; मंत्रीपदाचे स्वप्न भंगले
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

यावेळी उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला की प्रकाश आंबेडकरांबरोबर ठाकरे गटाची युती आहे. परंतु, प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे की त्यांना महाविकास आघाडीचं किंवा इंडिया आघाडीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची युती आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे, त्यावर काय सांगाल? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांच्याशी व्यवस्थित चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल.

उद्धव ठाकरे म्हणाले, आमची (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती आहे. ही युती आम्ही २३ जानेवारीला जाहीर केली आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांनी युती केली आहे. परंतु, इंडिया आघाडीत किंवा महाविकास आघाडीत येण्याची त्यांची इच्छा आहे का हे आम्हाला प्रकाश आंबेडकरांना विचारावं लागेल. त्यांच्याशी चर्चा करावी लागेल.

हे ही वाचा >> Chandrayaan 3 : तू तिकडे बघ मी फोटो काढतो! ‘प्रज्ञान’ने ‘विक्रम’चं चंद्रावर केलेलं फोटोशूट पाहून व्हाल खूश

कोणतेही पक्ष एकत्र आल्यानंतर एकमेकांपासून वेगळे होण्यासाठी युती होत नाही. प्रकाश आंबेडकरांशी व्यवस्थित चर्चा करून पुढचा निर्णय घेतला जाईल. जर त्यांची तयारी असेल तर तेसुद्धा महाराष्ट्रात महाविकास आघाडीत आणि देशात इंडिया आघाडीत येऊ शकतात.

Story img Loader