मोगॅम्बो काल म्हणाला की मी मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले. पण आत्ता जे काही राज्यात चाललं आहे त्यात कोण कोणाचं काय चाटतं आहे? तेच कळायला मार्ग नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांमध्ये अमित शाह यांना उत्तर दिलं आहे. आता जे काही राज्यात सुरू आहे ती कुठली चाटुगिरी आहे? कोण कोणाचा कुठला भाग चाटतो आहे? असा खोचक प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. त्याला आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

अमित शाह काय म्हणाले होते?

आमच्या युतीला मोठा विजय मिळाला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्ही मिळालं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करा. जे लोक खोटेपणाच्या आधारावर हुंकारत होते त्यांना आता सत्य काय आहे ते समजलं आहे.२०१९ च्या निवडणुकीच्या वेळी मी भाजपाचा अध्यक्ष होतो. त्यावेळी आम्ही निवडणूक युती म्हणून लढलो. स्वतःच्या फोटोपेक्षा मोदींचा मोठा फोटो लावून त्यांनी आमच्यासोबत निवडणुका लढल्या. देवेंद्रजींना नेता मानून निवडणूक लढली त्यानंतर मुख्यमंत्री हे पद मिळावं म्हणून विरोधी विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले. त्यांना आज सत्य काय आहे समजलं आहे असं अमित शाह यांनी म्हटलं होतं.

sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Marathi actor abhijeet kelkar reaction on trolling about suraj Chavan his post
“मी ब्राम्हण जातीतला असलो तरी…”, सूरज चव्हाणबद्दल केलेल्या पोस्टवरील ट्रोलिंगवर अभिजीत केळकरचं भाष्य, म्हणाला, “मला शिव्या देऊन..
Pimpri Vidhan Sabha, Sharad Pawar candidate,
पिंपरी विधानसभा : ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बंडाचा इशारा दिल्यानंतर शरद पवारांच्या उमेदवार काय म्हणाल्या? वाचा..
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक पोस्टमध्ये म्हणाले, “सुना है पुराने दोस्तों ने…”
What Kiran Pavasakar Said About Uddhav Thackeray?
Shivsena Vs MNS : “उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंबरोबरचं नातं जपायला हवं होतं आणि…”, ‘या’ नेत्याची बोचरी टीका!
amit thackeray
“…तेव्हा माझ्या पोटात गोळा आला”; उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया!
Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil:
Jayashree Thorat : “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर..”, बाळासाहेब थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना इशारा

मी हिंदुत्व सोडल्याचं म्हणता मग तुम्ही काय सोडलं होतं?

मी काँग्रेससोबत गेलो तेव्हा मी हिंदुत्व सोडलं म्हणाले. तुम्ही मेहबुबा मुफ्ती सोबत गेलात तेव्हा काय सोडलं होतं? की तेव्हा हिंदुत्वापासून टाइम प्लीज घेतली होतीत? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. प्रमोद महाजन यांना एकदा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की एक दिवस असं होईल की देशातले लोक हिंदू म्हणून मतदान करतील. आज हिंदू जागा झाला आहे. मात्र त्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम सुरू आहे. निवडणूक आली की हिजाबचा मुद्दा काढायचा, गोहत्येचा मुद्दा काढायचा असे मुद्दे काढून हिंदूंच्या डोळ्यात धुळफेक केली जात आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

इन्कम टॅक्स, ईडीसारखे लांडगे विरोधकांवर सोडले जात आहेत

इन्कम टॅक्स, ईडी यांच्यासारखे लांडगे विरोधकांवर सोडायचे आणि त्यानंतर मी एकटा लढतोय सांगायचं याला काय अर्थ आहे? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. आज सगळ्या गोष्टी फक्त बुद्धिबळाच्या पटासारख्या झाल्या आहेत. आमच्यातल्या काही लोकांना यांनी पट्टा बांधून सोबत नेलं आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

माझ्या पक्षातले लोक मलाच हाकलू पाहात आहेत

माझ्या पक्षातले काही लोक दुसरीकडे गेले. माझेच लोक मला माझ्याच घरातून बाहेर काढू पाहात आहेत. त्यांना आता मालक व्हायचं आहे. आमचा निवडणूक आयोगही असा आहे की चोरांना मालक केलं आहे. आज सगळ्या विरोधी पक्षांनी डोळे उघडले पाहिजेत कारण आज जे आमच्यासोबत झालं ते उद्या तुमच्यासोबत होईल. यांना बाळासाहेब ठाकरेंचा चेहरा पाहिजे पण त्यांचा मुलगा नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. ज्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला धोका दिला त्यांना तळवे चाटणारे चालतात का? असंही उद्धव ठाकरेंनी विचारलं आहे.

हिंदू आक्रोश मोर्चा सारखी तर थट्टा नाही

हिंदू आक्रोश मोर्चा निघाला यासारखी तर थट्टा नाही कारण जगातला सर्वात बलवान व्यक्ती जर देशाचा पंतप्रधान आहे तर मग देशातल्या हिंदूला आक्रोश का करावा लागतो आहे? या देशात जो राहतो तो आमचा बांधव आहे. मग हिंदू, मुस्लिम, उत्तर भारतीय कुणीही असो तो आमचा बांधव आहे हेच आमचं हिंदुत्व आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी एक जवान होता त्याला ठार केलं गेलं. त्याचं नाव औरंगजेब होतं. त्याला मी भाऊ म्हटलं त्यावर माझ्यावर टीका करण्यात आली.

मुंबईला दासी करायचा डाव

मुंबईला दासी करण्याचा भाजपाचा डाव आहे. प्रत्येक गोष्टीसाठी भिकाऱ्यासारखं कटोरा घेऊन तुमच्या दारात उभं राहिलं पाहिजे अशी यांची अपेक्षा आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मुंबईत उत्तर भारतीयांना संबोधित करत असताना उद्धव ठाकरे यांनी ही सगळी टीका केली आहे. उत्तर भारतीयांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केलं आहे.