Uddhav Thackeray Interview Today : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर या बंडखोरीमागे नेमकी काय कारणं? कोण जबाबदार? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या बंडानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दिलीय. यात त्यांनी शिवसेनेतील बंडखोरीमागील कारणं आणि शिवसेनेचा पुढील राजकीय प्रवास यावर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी ते रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना सरकार पाडण्याचे प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केलाय. ही मुलाखत ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली.

“तुम्ही रुग्णालयात बेशुद्धावस्थेत असताना तुमचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत होता,” असं म्हणत संजय राऊत यांनी पक्षातील बंडखोरांबाबत विचारणा केली. यावर उद्धव ठाकरेंनी त्या विषयावर बोलू का? असा प्रश्न विचारला. तसेच मला माझ्या त्या अनुभवातून कुठेही सहानुभुती नको आहे, असंही नमूद करत तसा सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला.

Uddhav Thackeray on Gadgebaba
Uddhav Thackeray : “संत गाडगेबाबा घरी यायचे, दरवाजाबाहेर उभं राहून…”, उद्धव ठाकरेंनी सांगितला आजोबांच्या काळातील आठवण
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
uddhav thackeray criticized amit shah
“गद्दारांनी गुवाहाटीचा डोंगर बघितला, आता त्यांना टकमक टोक दाखवायचंय”, उद्धव ठाकरेंची शहाजीबापू पाटलांवर घणाघाती टीका!
What Raj Thackeray Said?
Raj Thackeray : ‘सत्तेत जायचा फॉर्म्युला काय?’ राज ठाकरे म्हणाले, “या निवडणुकीत..”
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
Uddhav Thackeray Raj Thackeray
“राज ठाकरे भाषण करून गेले तिथे अडरवर्ल्डच्या मदतीने…”, ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप; म्हणाले, “अनेक मतदारसंघांत गुंडांच्या टोळ्यांना…”
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”

हेही वाचा – Uddhav Thackeray Interview : शिवसेनेत विश्वासघाताचं राजकारण वारंवार का होतं? बाळासाहेब-माँचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंनी सांगितली कारणं

“माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती”

उद्धव ठाकरे म्हणाले, “तो फार वाईट अनुभव होता. मानेची शस्त्रक्रियेत काय धोके असतात हे कोणताही डॉक्टर सांगू शकेल. त्याची कल्पना मलाही होती. मात्र, ही शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. पहिली शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी त्यातून व्यवस्थित बाहेर पडलो. पाच-सहा दिवसांनी सकाळी जाग आल्यावर आळस देण्याचा प्रयत्न केला आणि अचानक मानेत वेदना जाणवल्या. त्यानंतर माझी मानेखालील सर्व हालचाल बंद झाली होती.”

“मला श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं”

“मला तेव्हा श्वास घेता येत नव्हता आणि पोटही हलत नव्हतं. मी पूर्णपणे निश्चल झालो होतो. मानेत एक रक्ताची गुठळी तयार झाली होती. सुदैवाने डॉक्टर जागेवर होते. त्यामुळे ‘गोल्डन आवर’मध्ये (Golden hour) ती शस्त्रक्रिया झाली. म्हणून मी तुमच्यासमोर आज उभा आहे. त्या काळात काही गोष्टींची माहिती माझ्या कानावर येत होती,” अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली.

हेही वाचा – भाजपाला शिवसेना का संपवायची आहे? शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, “आता त्यांना…”

“तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं”

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “माझे हातपाय हालत नव्हते, बोटं हलत नव्हती. त्यावेळी काही लोक मी बरा व्हावा म्हणून देवासमोर अभिषेक करत होते आणि काहीजण मी असाच राहावा म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. देव पाण्यात बुडवून बसलेले आज पक्ष बुडवायला निघाले आहेत. तेव्हा हा आता उभा राहणार नाही, असं पसरवलं जात होतं. तसेच तुझं काय होणार असं बोललं जात होतं.”

हेही वाचा – खरी शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा? या प्रश्नावर उद्धव म्हणाले, “आम्हाला पुरावा द्यायची गरज नाही, निवडणुका येऊ दे…”

“माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या”

“पक्षप्रमुखाची शस्त्रक्रिया झाल्यावर यांनी पक्षाला सावरण्याची वेळ होती. मात्र, जेव्हा माझी हालचाल होत नव्हती, तेव्हा यांच्या पक्षविरोधी हालचाली वाढल्या होत्या. हे वेदनादायी सत्य आयुष्यभर माझ्यासोबत असेन. मी त्यांना दोन क्रमांकाचं पद देऊन पक्ष सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. मात्र, मी रुग्णालयात असताना त्यांनी विश्वासघात केला,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला.

पाहा मुलाखत –

“राजकारणातील ती चूक आमच्याकडून वारंवार होते”

उद्धव ठाकरे शिवसेनेतील विश्वासघाताच्या राजकारणावर बोलताना म्हणाले, “आम्ही पक्ष व्यावसायिक दृष्टीकोनातून चालवत नाही. बाळासाहेब ठाकरे, माँ यांनी आम्हाला पक्षातील नेत्यांना कुटुंब म्हणून पाहायला शिकवलं. एकदा आपलं म्हटलं की आपलं. त्यामुळे एखाद्यावर विश्वास टाकला की आम्ही अंधविश्वास टाकतो, ताकद देतो आणि राजकारणातील ती चूक आमच्याकडून वारंवार होते.”

हेही वाचा : बंडखोरांना उंदीर म्हणणारे अर्जुन खोतकर शिंदे गटात जाणार का? एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर म्हणाले, “हे खरं आहे…”

“२०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं?”

“आम्ही हिंदुत्व सोडलं अशी बोंब जे मारत आहेत त्यांना मला प्रश्न विचारायचं आहे की २०१४ मध्ये भाजपाने युती तोडली तेव्हा आपण काय सोडलं होतं? आजही शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही. तेव्हा शिवसेनेला विरोधी पक्षात बसावं लागलं होतं. तेव्हा अनेकांना वाटलं शिवसेना आता संपेल. मात्र, शिवेसना एकाकी लढली आणि ६३ आमदार निवडून आले,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.