शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी सायंकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाजी पार्कवर हा शपथविधी सोहळा झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. राजकीय नेते, उद्योगपती, सामाजिक, सास्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांच्या वचनाची पूर्ती झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०१९ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. ऐतिहासिक सत्तांतरानंतर झडलेल्या आरोपांच्या फैरी आणि त्यानंतर आलेला निकाल. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर भाजपा-शिवसेना युतीला बहुमत मिळालं. भाजपा-शिवसेनेची सत्ता येणार असं चित्र असताना राजकारण पलटलं. मुख्यमंत्रीपदासह सत्तेचं समसमान वाटप व्हावं, अशी मागणी करीत शिवसेनेने भाजपाला आव्हान दिलं.

मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेला आणि शिवसेना भाजपापासून दूर झाली. या सर्व काळात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असं सांगत होते. बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिलं आहे आणि ते पूर्ण करणार असं उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते.

भाजपापासून दूर गेल्यानंतर शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आघाडी केली. तिन्ही पक्ष सरकार स्थापन करण्याच्या तयारीत असताना भाजपानं अचानक सत्तास्थापनेचा दावा करत सरकारही स्थापन केले. त्यामुळे उद्धव ठाकरे हे वचन पूर्ण कसं करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण, देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेनं थेट न्यायालयीन लढाही दिला.

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि त्यानंतर काही तासांतच फडणवीस सरकार कोसळले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला. अखेर तो क्षण गुरूवारी सायंकाळी आला. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जमलेल्या जनसागराच्या साक्षीन राज्याचे २९वे मुख्यमंत्री म्हणून पदाची शपथ घेतली आणि त्यांनी बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण झालं.