शिवसेनेत फूट पडल्यानंतर खरी शिवसेना कोण हे ठरवण्यासाठी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं होतं. पक्ष आणि चिन्हावर दावा करण्यासाठी ठाकरे गटाकडून तब्बल दोन ट्रक भरून ११ लाख प्रतिज्ञापत्र आयोगासमोर सादर केली होती. या प्रतिज्ञापत्राचं काय केलंत असा प्रश्न विचारत निवडणूक आयोगावर गुन्हा दाखल केला पाहिजे, असा घाणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. वरळीत आयोजित केलेल्या महापत्रकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, माझं राहुल नार्वेकरांना आव्हान आहे की नार्वेकरांनी आणि मिंध्यांनी पोलीस संरक्षणाशिवाय यावं. मी ही तिथे सुरक्षेविना येईन. तिथंच तिथे नार्वेकरांनी सांगावं की शिवसेना कोणाची? मग जनतेचे ठरवावं की कोणाला पुरावा आणि कोणाला गाडावा. शिवसेना त्यांना विकली असेल तर ती काही विकावू वस्तू नाही. आज तर माझ्यासोबत शिवसैनिक आहेत. लाखो जनता, शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, असं ठाकरे म्हणाले.

News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Loksatta lalkilla Amit Shah statement of Congress defeat
लालकिल्ला: अमित शहांचे काँग्रेस पराभवाचे सत्यकथन!
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

हेही वाचा >> उद्धव ठाकरे आक्रमक! “एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकरांना माझं खुलं आव्हान आहे मैदानात सुरक्षा न घेता या आणि…”

ते पुढे म्हणाले की, आपण निवडणूक आयोगावर केस केली पाहिजे. कारण, त्यांनी आपल्याला कामाला लावलं होतं. १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जवळपास १९ लाख ४१ हजार प्रतिज्ञापत्र लिहिले होते. या प्रतिज्ञापत्राच्या गाद्या करून निवडणूक आयोग त्यावर झोपलं आहे का? एकतर हे प्रतिज्ञापत्र स्वीकारा. नाहीतर आमचे पैसे आम्हाला परत द्या. हा मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाचा घोटाळा आहे. येथे शिवसैनिकांचे पैसे गेले आहेत. येथे कोणी दोन नंबरचे पैसे कमावणारे कोणी नाही. ईडीसुद्धा त्यांचाच नोकर आहे.

“हे मी उघडपणाने बोलत आहे. मला काय चिंता. तुम्ही येथे आहात सर्व. तुम्ही बघून घ्याल सर्व”, असंही ते म्हणाले.

राहुल नार्वेकरांना लवाद म्हणून निर्णय घ्यायला सांगितलं होतं

राहुल नार्वेकरांना लवाद म्हणून निर्णय घ्यायला सांगितलं होतं. तुमच्याबरोबर जर सगळं काही आहे, शिवसेना विकली असेल तर विकता येणार नाही हे लक्षात ठेवा. व्हीप तुमचा वगैरे आम्हाला लागू होणार नाही. व्हीपचा मराठी अर्थ चाबूक आहे. चाबूक आमच्या हातात शोभून दिसतो लाचारांच्या हातात नाही. जी काही थट्टा चाललेली आहे ती आज तुम्ही पाहिली.

“गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्याशिवाय आता मढ्याला उपाव नाही” अशी सुरेश भटांची कविता आहे. राहुल नार्वेकर यांनी तसाच निर्णय घेतला आहे. गारद्यांच्या गर्दीत हे सामील झाले आहेत. ज्या महाराष्ट्रात रामशास्त्री जन्माला आले. घटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्याच मातीत ही अवदसा जन्माला आली आहे. लोकशाहीचे हत्यारे जन्म घेत आहेत आणि त्यांना महाशक्ती साथ देते आहे. त्यांना माहीत नाही ही महाराष्ट्राची माती अशांना गाडून टाकते आणि संपवून टाकते. सगळा क्रम पाहिल्यानंतर जे काही पुरावे सादर केले ते सादर करणं आवश्यक होते असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Story img Loader