निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे निवडणूक चिन्ह तसेच पक्षाचे शिवसेना हे नाव शिंदे गटाला दिले आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आगामी काळात राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांवर कठोर शब्दांत टीका केली आहे. चोर हा शेवटी चोरच असतो. त्यांना शिवसेनेचे चिन्ह कागदोपत्री मिळालेले असले तरी खरा धनुष्यबाण आमच्याकडेच आहे, असे ठाकरे म्हणाले. तसेच नामर्द कितीजरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते आज (१७ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल

“धनुष्यबाण चिन्ह ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते घेता येणार नाही. कारण शिवसेनेचे धनुष्यबाण शिवसेनाप्रमुखांच्या पूजेतील आहे. आता तिकडे जल्लोष सुरू असेल. आपली चोरी पचली म्हणून चोरांना आनंद झाला असेल. पण शेवटी चोर तो चोरच असतो. ज्याच्यामध्ये स्वत: काही करण्याची काही मर्दानगी नसते, तो नामर्दच असतो. नामर्द कितीजरी मातला तरी तो मर्द होऊ शकत नाही. हेच सत्य आहे,” अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

शेवटी चोरबाजारालाच जर मान्यता मिळणार असेल तर…

“आम्ही लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. तोपर्यंत त्यांना धनुष्यबाणाचे पेढे खाऊद्या. धनुष्यबाण चोरल्याचा त्यांना आनंद मिळू द्या. शेवटी चोरबाजारालाच जर मान्यता मिळणार असेल तर बाकीच्या बाजाराला अर्थ राहत नाही,” असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticize eknath shinde and rebel mla after election commission decision on shiv sena party bow and arrow symbol prd
Show comments