पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी खासदार संजय राऊत यांना काल जामीन मिळाल्यानंतर आज ते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ‘मातोश्री’ या उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी पोहोचले होते. यावेळी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी केंद्रीय तपास यंत्रणांवर जोरदार टीका केली. केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा – संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पाळीव प्राण्याप्रमाणे…”
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. तसेच खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक आणि माझे मित्रही आहेत. त्यांची जामीनावर सुटका झाली त्यांचा मला आनंद झाला आहे. मात्र, काल न्यायदेवतेने जो निर्णय दिला आहे, मी न्यायालयचे आभार मानतो. या निकालपत्रात न्यायालयाने परखड आणि अत्यंत स्पष्टपणे काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्यामुळे आता हे जगजाहीर झालं आहे की, केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागतात आहेत. ज्यांच्या अंगावर जा म्हटलं त्यांच्या अंगावर जातात. बेकायदेशीरपणे वागत असल्याचे संपूर्ण देशाने, जगाने बघितले आहे”, अशी प्रतिक्रिया उद्दव ठाकरे यांनी दिली.
हेही वाचा – संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पाळीव प्राण्याप्रमाणे…”
“सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही न्यायदेवता आपल्या ताब्यात घेतात की काय अशी वक्तव्य केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांची आहेत. त्यांनी न्यायदेवतेवर शंका उपस्थित केली आहे. एकूणच सर्व सामान्यांच्या आशेचा किरण हे न्यायालये असतात आणि न्यायलय जर आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल, तर देशातल्या तमाम जनतेने त्याचा विरोध पाहिजे”, असेही ते म्हणाले.
हेही वाचा – संजय राऊतांच्या जामिनानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “पाळीव प्राण्याप्रमाणे…”
“न्यायदेवतेच महत्त्व तिच्यावर भाष्य करणं हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा जर केंद्रीय कायदेमंत्रीच करत असतील तर त्यावर न्यायदेवता कारवाई करेल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा उपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले, तर काही पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जातो आहे”, असा आरोपही त्यांनी केला.