Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. खरं तर या विधानसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. यातच आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे अनेकांची धावपळ सुरु आहे, तर अनेकांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे, तर काहीजण बंडखोरीच्या तयारीत आहेत. यातच काहींनी पक्षांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी नाकारली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, त्यानंतर किशनचंद तनवाणी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी अंबादास दानवे यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट करत दिली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात मोठा ट्विस्ट पाहायला मिळला.
हेही वाचा : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; महायुतीत राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
दुसरीकडे शिवसेनेचे (ठाकरे) भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची आणि महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची देखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत ठाकरे गटाने तीन मोठ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अधिकृत रित्या घोषित केलेल्या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी जाहीर केली. तसेच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने जिल्हाप्रमुख…
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 28, 2024
अंबादास दानवे यांनी काय म्हटलं?
“पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अधिकृत रित्या घोषित केलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना तातडीने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पदावरून कार्यमुक्त केले. सदरील सर्व घोषणा मातृभूमी प्रतिष्ठाण संपर्क कार्यालयात आयोजित अधिकृत पत्रकार परिषदेत केली”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टवर म्हटलं आहे.
*शिवसेनेतून हकालपट्टी*
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 28, 2024
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विनायक राऊत
शिवसेना…
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाकडून भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची देखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी पक्षाच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून दिली आहे.
*शिवसेनेतून हकालपट्टी*
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 28, 2024
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विनायक राऊत…
शिवसेनेच्या (ठाकरे) अधिकृत एक्सवर काय म्हटलं?
“पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे”, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) नेते विनायक राऊत यांनी पक्षाच्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून देण्यात आली आहे.