वाई: कोण, उद्धव ठाकरे, त्यांनी आमच्या सरकारचा राजीनामा मागण्याचा अधिकारच काय असे केंद्रीय मंत्री नारायण राणे साताऱ्यात म्हणाले. उद्धव ठाकरेंनी आम्हाला नैतिकता शिकू नये. आम्हांला नैतिकता शिकवण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी राजीनामा दिला आणि मूर्खपणा केला हे आता त्यांनी मान्य केले आहे ना. आम्हाला आता २०२४ पर्यंत वेळ मिळाला आहे.
आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ त्यांनी आम्हाला नैतिकतेच्या गप्पा सांगून राजीनामा द्यायला सांगू नये. ते आम्हाला राजीनामा द्यायला सांगतात त्यांना काय अधिकार आहे. आम्हाला राजीनामा द्यायला सांगायचा असे उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगत साताऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पश्चिम महाराष्ट्र उद्योग परिषदेच्या निमित्ताने नारायण राणे साताऱ्याला आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी खासदार उदयनराजे भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते.
२०१९या निवडणुकीपर्यंत हे भाजपा बरोबर नांदत होते. भाजपचे मंगळसूत्र घालून त्यांनी एकत्र निवडणुका लढवल्या नंतर जिंकून आल्यानंतर त्यांनी शरद पवारांचा हात धरून संसार केला, आणि हे आता आम्हाला नैतिकता शिकवत आहेत. त्यांनी आम्हाला अजिबात नैतिकता शिकवू नये. आता ते राजीनामा देऊन घरात बसले आहेत ना, त्यांनी ते मान्यही केले आहे ना, मग आता घरातच रहा असा सल्लाही त्यांनी उद्धव ठाकरेंना दिला.