अलिबाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीनंतर अलिबाग शहरात त्यांच्या समर्थकांनी मोठय़ा प्रमाणात बॅनरबाजी केली आहे. मात्र या बॅनरवरती उध्दव ठाकरे यांचे छायाचित्र मात्र गायब झाल्याचे पाहायला मिळते आहे.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचे कट्टर समर्थक असलेल्या शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख राजा केणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. या बॅनरवर शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर स्व. अनंत दिघे यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र उध्दव ठाकरे यांचे छायाचित्र वापरण्यात आलेले नाही. विचार बाळासाहेबांचे आणि जिद्द धर्मवीरांची यावर निष्ठा शिवसैनिकांची असा संदेश या बॅनरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. 

Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Protest by a pro-Khalistan mob outside the Indian High Commission in London met counter-protest
Video : लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांना भारतीयांनी दिलं सडेतोड उत्तर; भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनं सुरू होताच…
Ekanth Shinde
Eknath Shinde : “आज बाळासाहेब असते तर त्यांनी…”, विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल एकनाथ शिंदेंनी व्यक्त केली भावना
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare :
Bharatshet Gogawale : राष्ट्रवादी-शिंदे गटातील वाद विकोपाला? “सुनील तटकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला”, भरत गोगावलेंचं मोठं विधान
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”
bharat gogawale
पालकमंत्री निवडीवरून वाद, शिंदे गटातून संतप्त प्रतिक्रिया; गोगावले समर्थकांनी वाहतूक रोखली
Uday Samant On Thackeray group
Uday Samant : उद्धव ठाकरेंना धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “पुढच्या आठ दिवसांत ठाकरे गटातून…”

बंडखोर आमदार आपण शिवसेनेत असल्याचे सांगत असले तरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यापासून ते चांगलेच दुरावले असल्याचे यावरून दिसून येत आहे. महाड येथे भरत गोगावले यांच्या समर्थनार्थ झालेल्या रॅलीत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येनी सहभागी झाले होते. तेव्हापासून शिवसेना पक्ष संघटनेत मोठी फुट पडण्याची चिन्ह दिसू लागली होती. तर ज्यांच्या नेतृत्वाखाली अडीच वर्ष राज्यात सत्ता उपभोगली आणि असे पक्षप्रमुख उध्दव ठाकरेही आता आमदारांना नकोसे झाले असल्याचे दिसून येत आहे.

अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. त्यांमुळे मतदारसंघात शिवसेनेत दोन गट पडल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी हे शिवसेनेसोबत असल्याचे अलिबाग येथे नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात दिसून आले होते. मात्र त्याच वेळी आमदार दळवी समर्थक आणि कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येनी रस्त्यावर उतरून आम्ही आमदारांच्या पाठीशी असल्याचे दाखवून दिले होते. त्यामुळे आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शिवसेनेची वाटचाल कशी होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Story img Loader