Uddhav Thackeray शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या एच. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या सर्व चाचण्या पार पडल्यानंतर त्यांना एच. एन. रिलायन्स रुग्णायातून डिस्चार्ज देण्यात आला. उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) हे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी परतले आहेत.

उद्धव ठाकरेंवर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्यावर काही वर्षांपूर्वी अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. ते आता पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे शिवसैनिक चिंतेत आहत. धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी त्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याचं आयएएनएस या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे. त्यांची अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी पार पडली. उद्धव ठाकरे यांना बरं वाटत नसल्यामुळे रुग्णालयात नेण्यात आलं होतं. याआधीही त्यांची अँजिओप्लास्टी देखील झाली आहे. त्यामुळे डॉक्टर हार्ट ब्लॉकेजशी संबधित व हृदयाशी संबंधित इतर तपासण्या केल्या. अँजियोग्राफीमद्वारे हार्ट ब्लॉकेज तपासता येतात. अँजिओग्राफीत हार्ट ब्लॉकेज आढळले तर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी व इतर उपचार करण्यात येतात. मंगळवारी रात्री उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) रुग्णायातून डिस्चार्ज देण्यात आला. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं होतं?

आदित्य ठाकरे एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर पोस्ट करत म्हणाले, “सोमवारी सकाळी उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांची सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणी झाली. तुमच्या शुभेच्छांमुळे सर्व काही ठीक आहे. आणि ते कामावर परतण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे तयार आहेत.”

तीन वर्षांपूर्वी मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती

मानेच्या दुखण्यावरील उपचारांसाठी उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू करण्यात आली. या दुखण्यातून सावरण्यासाठी त्यांना अनेक आठवडे लागले होते.

हे पण वाचा- Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस ते एकनाथ शिंदे व्हाया उद्धव ठाकरे! महाराष्ट्राचं राजकीय महाभारत पाच वर्षांत कसं बदललं?

दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका

दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली होती. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहे. आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन होत असतं. प्रत्येकाकडे वेगळी शस्त्रं असतात. कुणाकडे गन आहे, कुणाकडे अजून काय आहे. आमच्याकडे लढवय्या मन आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच त्यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख म्हणाले होते, आम्ही आज (१२ ऑक्टोबर) शस्त्रपूजा केली त्यात बाकी शस्त्र आहेतच, पण शिवसेना प्रमुखांच्या कुंचल्याची (व्यंगचित्र काढण्यासाठी वापरला जाणारा ब्रश) पूजाही आम्ही केली. आता तुम्हा सगळ्यांची पूजा करतो आहे. कारण तुम्ही सगळेजण शिवसेनेची शस्त्रं आहात. एकीकडे अब्दालीसारखी माणसं, यंत्रणा, केंद्रात सत्ता असं सगळं आहे. यांनी मनसुबा आखला आहे की उद्धव ठाकरेंची सेना संपवा. पण ही शिवसेना नाही ही वाघनखं आहेत जी माझ्यासमोर बसली आहेत. असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ते मातोश्रीवर परतले आहेत.