राज्यात गेल्या काही दिवसांपासून अर्थखात्याचा घोळ चर्चेचा विषय ठरला होता. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर त्यांना अर्थखातं हवं असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळेच खातेवाटप तब्बल दोन आठवडे लांबल्याचंही बोललं गेलं. अखेर शुक्रवारी दुपारी खातेवाटपाची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात आता विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर व विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं जात आहे. यासंदर्भात नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे.

“शिंदे गटाचं महत्त्व आता संपलं आहे”

“शिंदे गट व अजित पवार गट यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. शिंदे गटात अनेक तालेवार लोक आहेत. ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि सरकारमध्ये अनेक वर्षं काम केलंय. अजित पवारांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही नक्कीच सहमत नाहीत. हा निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा नाही. या निर्णयामुळे महाराष्ट्राचं नुकसानच होणार. तरीही अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या लोकांचा अनुभव दांडगा आहे. शिंदे गटाचं महत्त्व फक्त शिवसेना फोडण्यापुरतं होतं. आता त्यांचं महत्त्व संपलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal Devendra Fadnavis Meet
Ajit Pawar : भुजबळ-फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांचं मोठं विधान; उपायाबाबत म्हणाले, “आम्ही आमच्या पद्धतीने…”!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Ajit Pawar
Ajit Pawar : “…तेव्हा आई देवाचा जप करत बसली होती”, अजित पवारांनी सांगितला विधानसभेच्या निकालाच्या दिवशीचा किस्सा
buldhana protest against home minister amit shah
अमित शहांचा पुतळा जाळला…राष्ट्रमाता जिजाऊंच्या माहेरी जमलेल्या आंदोलकांनी…
Prithviraj Chavan comment on Amit Shah, Amit Shah ,
अमित शहांच्या विधानातून संघाच्या द्वेष भावनेचे प्रदर्शन, पृथ्वीराज चव्हाण यांनी साधला निशाणा
Beed District Sarpanch murder , Sarpanch murder,
बीड जिल्ह्यातील सरपंचाची हत्या, विधानसभेत काय घडले?
Rupali Thombre Patil on Ajit Pawar
“अजित पवारांनी उद्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी युती केली तरी..”, रुपाली ठोंबरे पाटील यांचं अजब विधान
Sunanda Pawar: “मूठ घट्ट असेल तर त्याची ताकद…”, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सुनंदा पवार यांचं मोठं विधान

“शिंदेगट हा काही राज्यकर्ता पक्ष नाही. अजित पवारांचा गटही सत्तेत फार काळ राहील याविषयी शंका आहे. भाजपाचं धोरण ‘वापरा आणि फेका’ हे कायम राहिलंय. देशात अनेक राजकीय पक्ष त्यांनी घेतले, तोडले, वापरले आणि फेकून दिले. महाराष्ट्रातील दोन्ही गटांची अवस्था त्यापेक्षा वेगळी होणार नाही. तुम्ही ज्याला कूटनीती म्हणताय, तीच आम्ही अडीच वर्षांपूर्वी केली होती. त्याला तुमची मान्यता नव्हती”, अशा शब्दांत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.

पुन्हा अजित पवारांकडेच अर्थखातं, आता काय? मुख्यमंत्री म्हणतात, “तेव्हा…!”…

“शिंदे गटाला अजित पवारांची धुणीभांडी करावीच लागतील”

दरम्यान, यावेळी अजित पवारांच्या अर्थखात्यावरून संजय राऊतांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. “अजित पवारांकडे अर्थखातं गेल्यामुळे फरक पडणार नाही असं बोलण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नाही. त्यांना अजित पवारांची धुणीभांडी करावीच लागेल. अजित पवारांचा निधी हा दुसरा मुद्दा आहे. अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच आमच्याबरोबर नको हे त्यांचं म्हणणं होतं. आज ते सत्तेत सहभागी झाल्यावर हे सगळे लोक आनंदानं टाळ्या वाजवत आहेत. ही त्यांची मजबुरी आहे. ते याशिवाय दुसरं काहीही करू शकणार नाहीत”, असं राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊतांचा मोठा दावा

“माझी पक्की माहिती आहे की दिल्लीला हे गेले. पण दिल्लीनं यांचं काहीही ऐकलं नाही. राहायचं असेल तर राहा, नाहीतर जा. दिल्लीनं त्यांना असा प्रस्ताव दिला की अजित पवारांना अर्थखातं द्यायचं नसेल, तर अर्थखातं तुमच्याकडे ठेवा आणि मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे द्या. या प्रस्तावावर हे मागे आले ही माझी पक्की माहिती आहे. अर्थखात्याचा कौल अजित पवारांच्या बाजूनेच पडला आहे. जेव्हा हट्ट धरण्यात आला, तेव्हा दिल्लीनं यांना दोन पर्याय आले. त्यावर शिंदे गटाची माघार झाली आहे”, असा दावा संजय राऊतांनी यावेळी केला.

Story img Loader