बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्कवर शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये राडा झाल्याचा प्रकार घडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एक दिवस आधीच स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर दोन्ही गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी आधी घोषणाबाजी व नंतर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या सर्व प्रकारावर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यावरून शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे. बाळासाहेब ठाकरे स्मारकस्थळी गोंधळ घालणाऱ्यांना शिवसैनिक म्हणता येणार नाही, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव”

“काल स्मृतीस्थळावर येऊन ज्या बेईमान गटाच्या लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, नौटंकी केली, त्यांना शिवसैनिक कसं म्हणता येईल? ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेला तिलांजली दिली, शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला ते शिवसैनिक कसे? बाळासाहेब ठाकरे सगळ्यांचे आहेत. पण काल ज्यांनी तिथे नौटंकी केली, त्यांना आम्ही कधीच शिवसैनिक मानणार नाही. संत तुकडोजी महाराजांचा एक अभंग आहे. मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही रे”, असं संजय राऊत म्हणाले. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
akshay kumar share update on phir hera pheri 3
‘हेरा फेरी ३’ची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारने दिली महत्त्वाची माहिती; म्हणाला, “पुढील वर्षी…”
Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
Navjot Singh Sidhu
“अर्चना पूरन सिंगच्या जागी मी पुन्हा यावं…” नवज्योत सिंग सिद्धूंचे वक्तव्य; कपिल शर्मा शोमध्ये परतणार का?
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”

बाळासाहेबांच्या स्मारकाजवळ शिवसेनेचे दोन्ही गट भिडले, मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना करत संजय राऊतांचा संताप

“ही २०२४ची तयारी आहे”

“जो खरा निष्ठावंत आहे, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक आहे त्यानं विरोध केला असेल तर तो महाराष्ट्राला मान्य आहे. काल जो प्रकार घडला त्यात निष्ठावंत शिवसैनिकांनी गद्दारांना प्रतिकार केला. कालचा तो ट्रेलर आहे. २०२४ ची ही तयार आहे. काल तिथे आलेल्यांनी आधीच १० वेळा पक्ष सोडलाय. ते आम्हाला काय निष्ठा शिकवतायत? कुणी काँग्रेसमध्ये गेले, कुणी राष्ट्रवादीतून पुन्हा शिवसेना शिंदे गटात गेले”, असंही राऊतांनी नमूद केलं.

“त्यांच्यात श्रद्धा असती तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या पाठीत खंजीर खुपसून कमळाबाईच्या दारात गुलामी केली नसती. काल झालं तो ट्रेलर आहे. पुढे बघा काय होतंय”, असा इशाराही राऊतांनी दिला.