२०२२ साली शिवसेनेत पडलेली पक्षाच्या इतिहासातील सर्वात मोठी फूट हा अजूनही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतो. पण सध्या त्याहीपेक्षा जास्त चर्चा आहे ती २०१९ साली तुटलेल्या सेना-भाजपा युतीची. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात एनडीएच्या महाराष्ट्रातील खासदारांच्या बैठकीत केलेल्या विधानामुळे ही चर्चा सुरू झाली आहे. यात २०१९ साली शिवसेनेनं युती तोडली, असा दावा पंतप्रधानांनी केला होता. त्यावरून आता ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे.

नेमकं काय घडलं दिल्लीत?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमध्ये एनडीएच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांसंदर्भात आघाडीच्या कामगिरीचा आढावा घेतानाच खासदारांना पुढील वाटचालीसाठी काही सूचना केल्या. यावेळी “२०१९ साली शिवसेनेनंच युती तोडली”, असा दावा मोदींनी केला. यावरून राजकीय वर्तुळात चर्चा झाल्यानंतर आता संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत बोलताना त्यावर भाष्य केलं आहे.

Eknath shinde Sanjay raut
Sanjay Raut: २३ नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय? संजय राऊत म्हणाले…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणतात,’ मोदींनी नक्षलवाद व आतंकवाद संपविला’
Oppositions stole promises along with schemes criticized Eknath Shinde in Ambernath
“विरोधकांनी योजनांसह वचननामाही चोरला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची अंबरनाथमध्ये टीका
Eknath Shinde allegation regarding Mahavikas Aghadi manifesto Jalgaon news
महाविकास आघाडीने जाहीरनामा चोरला; एकनाथ शिंदे यांचा आरोप
sana malik
Sana Malik : “नवाब मलिक तुरुंगात असताना पक्षातील लोकांनी…”, सना मलिक यांचा गंभीर आरोप!
Eknath Shinde, Eknath Shinde comment on Mahavikas Aghadi, Mehkar,
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, “धनुष्य चोरायला ते काही खेळणं आहे का? लाडक्या बहिणींना एकविसशे रुपये…”
Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Ajit Pawar scolded Ravi Rana
“महायुतीत मिठाचा खडा टाकू नका”, मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री अजित पवारांनी रवी राणांना खडसावले

काय म्हणाले राऊत?

“मोदींनी दिल्लीत महाराष्ट्राच्या एनडीए खासदारांच्या बैठकीत सांगितलं की ‘२०१९ साली आम्ही युती तोडली नाही, शिवसेनेनं तोडली’. हे खोटं आहे. मुळात २०१४ साली भाजपानं युती तोडली. एका जागेवरून. ती युती तोडण्याची जबाबदारी पक्षानं एकनाथ खडसेंवर सोपवली होती”, असं राऊत म्हणाले.

“देवेंद्र फडणवीसांचे सर्वोच्च बॉस…”, संजय राऊतांचा खोचक टोला; मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा केला उल्लेख!

“२०१४ ची युती नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्या सूचनेवरून भाजपानं तोडली. तेव्हा मोदींची हवा होती. त्यांना स्वबळावर महाराष्ट्र जिंकायचा होता. त्यामुळे २५ वर्षांची मैत्री त्यांना तोडायची होती. नंतर आम्ही परत सत्तेत आलो. २०१९ साली त्यांनी पुन्हा युती तोडली. आम्ही नाही तोडली”, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

“अमित शाह मातोश्रीवर आले तेव्हा…”

दरम्यान, २०१९ साली मातोश्रीवर झालेल्या ‘त्या’ बंद दाराआडच्या चर्चेबाबतही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. “२०१९ साली युती करण्याआधी अमित शाह मातोश्रीवर आले होते. तेव्हा दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. ती चर्चा काय झाली, हे स्वत: देवेंद्र फडणवीसांनी हॉटेल ब्लू सी, वरळीच्या पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. ते म्हणाले होते ‘जागावाटप, युती, सत्तावाटप यावर एकमत झालं आहे. २०१९च्या निवडणुकीनंतर विधानसभेतलं महाराष्ट्रातलं सत्तावाटप ५० टक्के असेल’. हे त्यांनी स्वत: सांगितलंय. निकाल लागल्यानंतर त्यांनी शब्द फिरवला”, असं राऊत म्हणाले.

“एकनाथ शिंदे तेव्हाच मुख्यमंत्री झाले असते”

“एकनाथ शिंदे २०१९ सालीच मुख्यमंत्री झाले असते. उद्धव ठाकरे त्यांनाच मुख्यमंत्री करणार होते. पण भाजपानं त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायला नकार दिला. त्यांनी विचारलं की तुमचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? आम्ही कळवलं एकनाथ शिंदे. कारण ते तेव्हाही विधिमंडळ पक्षाचे नेते होते. त्यानंतर युती तुटली आहे. २०१९ साली युती तुटण्याला कारण एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद हे आहे. आता ते खोटं बोलतायत. हे भंपक लोक आहेत. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करत आहेत. तुम्ही देशातल्या अनेक विषयांवर खोटं बोलतायत. पण राज्याची जनता ज्याला साक्ष आहे, त्या विषयावर तरी खोटं बोलू नका”, असं म्हणत संजय राऊतांनी नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे.

“एकनाथ शिंदेंचे चिरंजीव दोन वेळा…”, संजय राऊतांचं श्रीकांत शिंदेंवर टीकास्र; म्हणाले,…

“त्याच एकनाथ शिंदेंना तुम्ही शिवसेना फोडून मुख्यमंत्री करत आहात म्हणजे तुम्ही किती कारस्थानी लोक आहात. शिवसेनेविषयी तुमच्या मनात किती द्वेषभावना आहे हे स्पष्ट दिसतंय”, असंही ते म्हणाले.