राष्ट्र्वादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडानंतर सत्ताधारी भाजपा आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. इतर पक्षांमध्ये असताना भ्रष्टाचारी असणारे नेते भाजपात आल्यावर स्वच्छ कसे होतात? असा प्रश्न विरोधकांकडून सातत्याने उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला आहे. भाजपा हाच एक राष्ट्रीय चोर बाजार झाल्याची टीका यात करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“देवेंद्र फडणवीस मोदींची थुंकी झेलून म्हणतात…”

“काँग्रेस किंवा अन्य राजकीय पक्ष ‘लूट की दुकान’ असेल तर तो लुटीचा माल विकत घेऊन भाजप आपले घर का भरत आहे? याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी करायला हवा. मुळात भाजप हाच आता राष्ट्रीय चोर बाजार झाला आहे. चोरीचा, लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून तो बदनाम झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे मोदींचीच थुंकी झेलून म्हणतात, ‘मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. येताना दोघांना घेऊन आलो.’ हे दोघे म्हणजे शिंदे-अजित पवार. दोघांवर अमाप भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. म्हणजे ‘येताना भ्रष्टाचाराचा व लुटीचा माल घेऊन आलो’, असेच श्रीमान फडणवीस यांना सांगायचे असावे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

“पंतप्रधान मोदी आठ दिवसांपूर्वी म्हणाले होते, ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळय़ात भ्रष्ट पक्ष आहे.’ त्याच राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी लगेच मांडीवर घेतले. आता मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरदेखील हल्ला केला. केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार असा आरोप मोदी यांनी केला. आता आम्हाला भीती वाटते ती केसीआर पक्षाची. कारण मोदी ज्या पक्षाला भ्रष्ट मानतात तो पक्ष पुढच्या काही काळात भाजपचा मित्र बनून सत्तेत सहभागी होतो किंवा त्या भ्रष्ट पक्षात फूट पाडून त्यातला सगळय़ात भ्रष्ट गट भाजपवासी केला जातो”, असा खोचक टोलाही ठाकरे गटानं लगावला आहे.

शरद पवारांची इतक्या वर्षांची साथ का सोडली? एकच कारण आहे म्हणत दिलीप वळसे-पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले…

“भाजपा म्हणजे लूट का मॉल”

“पंतप्रधान मोदी हे दुतोंडी असल्यासारखे वागतात व बोलतात. आपल्या लोकांचा भ्रष्टाचार झाकून ठेवायचा व राजकीय विरोधकांना भ्रष्टाचारी म्हणून बदनाम करायचे हे त्यांचे धोरण आहे. अदानी यांच्या भ्रष्टाचारास व लुटमारीस थेट पंतप्रधान मोदी यांचेच पाठबळ आहे व या लुटीचे आकडे मोठे आहेत. काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान’ असेल तर आजची भाजप म्हणजे ‘लूट का मॉल’ आहे”, अशा शब्दांत ठाकरे गटानं मोदींना लक्ष्य केलं आहे.