हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालावरून गौतम अदाणी व त्यांचा अदाणी उद्योग समूह अडचणीत आला होता. समभागांच्या विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप हिंडेनबर्गनं ठेवला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे अदाणींबाबत सेबीकडूनच योग्य तो तपास होणार, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर एकीकडे अदाणींनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली असताना दुसरीकडे विरोधकांनी त्यावरून मोदी सरकारला व भाजपाला लक्ष्य केलं आहे. ठाकरे गटानं यासंदर्भात टीका करताना राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

“अलिकडे अदाणींच्या बाबतीतच सत्याचा विजय होतो”

“अदाणींच्या बाबतीतच अलीकडे सत्याचा विजय होतो व इतरांच्या बाबतीत सत्य भूमिगत होते, हे असे का व्हावे? देशातील सार्वजनिक उपक्रम, जंगले, जमिनी अदाणी यांना देण्यात आल्या. इलेक्शन कमिशन, केंद्रीय तपास यंत्रणांचेही एकप्रकारे खासगीकरण झाल्याने मोदी-शहा ज्यांच्याकडे बोट दाखवतील त्यांना अपराधी ठरवून तुरुंगात डांबले जाते; पण अदाणी यांच्या बाबतीत व्यवहारांचा इतका गदारोळ उठूनही सर्व यंत्रणा डोळेझाक करून बसल्या”, असा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Manisha Khatri as Commissioner of Nashik Municipal Corporation
नाशिक महानगरपालिका आयुक्तांचे बदलीनाट्य, आता मनिषा खत्री यांची नियुक्ती
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Advay Hire , Malegaon Bazar Committee Chairman,
मालेगाव बाजार समितीचे सभापती अद्वय हिरे अपात्र, शिवसेना ठाकरे गटाला धक्का
prashant bhushan on gst nirmala sitharaman
Nirmala Sitharaman: “निर्मला सीतारमण जीनियस आहेत, १ लाखाच्या कारवर…”, प्रशांत भूषण यांनी GST चं मांडलं गणित!
महाराष्ट्रातील तो फॉर्म्युला बिहारमध्येही चालणार? भाजपा नितीश कुमार यांना का सांभाळून ठेवतंय? (फोटो सौजन्य पीटीआय )
महाराष्ट्रात जे घडलंय, ते बिहारमध्येही घडणार? भाजपासाठी नितीश कुमार इतके महत्वाचे का?
Sanjay Raut On MNS chief Raj Thackeray Uddhav Thackeray meet
Udhhav Thackeray-Raj Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र येणार? भूमिका स्पष्ट करत राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शाह हे त्यांचे…”
Uddhav Thackeray Criticized Amit Shah and Modi
Uddhav Thackeray : “हिटलर आणि मुसोलिनीही भरघोस मतांनी…”; उद्धव ठाकरेंची मोदी-शाह यांच्यावर बोचरी टीका

“अदाणी हेच भाजपा”

“अदाणींवर आरोप होतात तेव्हा भाजपाचा जीव कासावीस होतो. यामागचे अर्थकारण लपून राहिलेले नाही. महाराष्ट्रात ज्यांच्याविरुद्ध ईडी-इन्कम टॅक्सच्या चौकशांचा फेरा सुरू होता, ते भाजपात जाताच तो चौकशीचा फेरा थांबला आहे. अदाणी हेच भाजप असल्याने त्यांच्याविरुद्ध चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांनाच वधस्तंभावर चढवले जाईल”, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’कडून मोदी यांच्या कारकीर्दीची प्रशंसा; भारताची आर्थिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत प्रगती

“महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार दीड वर्षांपासून चालवले जाते. या सरकारने भांडवलदारांची तळी उचलून मुंबई अदाणी यांच्या घशात घालण्याचा डाव रचला आहे. शिवसेना व उद्धव ठाकरे सत्तेवर असते तर ते घडू दिले नसते. म्हणून अदाणी यांनी पैशाचा वापर करून महाराष्ट्राचे सरकार पाडले व त्यांचा एजंट मुख्यमंत्रीपदी आणून बसवला. निवडणूक आयोग, न्यायालयांनी हे सर्व घटनाबाह्य कार्य चालवून घेतले, कारण सत्य हे आज तरी अदाणी यांच्या बाजूने आहे. देशाची लूट, महाराष्ट्राची लूट व एकाच उद्योगपतीची भरभराट यासाठी केंद्र व राज्यातले सरकार झिजते आहे”, अशा शब्दांत अदाणींचा उल्लेख करत महाराष्ट्रातील महायुती सरकारवरही ठाकरे गटानं हल्लाबोल केला आहे.

Story img Loader