शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सत्ताधारी शिंदे गट व भाजपा यांच्यावर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे गटावर त्यांनी त्यांच्या सभांमधूनही परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. पण त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सातत्याने भूमिका मांडली आहे. या पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारेंनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एक्सवर (ट्विटर) केलेल्या पोस्टमध्ये सुषमा अंधारेंनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

काय आहे पोस्टमध्ये?

या पोस्टमध्ये सुषमा अंधारेंनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे. “उठा उठा देवेंद्रजी, पोलिसांची गाडी थांबली. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकिटं पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड”, असं सुषमा अंधारेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Nitin Gadkari on Road Accidents
Nitin Gadkari: ‘मी तेव्हा माझे तोंड लपवतो’, नितीन गडकरींनी लोकसभेत बोलताना व्यक्त केली खंत
mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
Kurla Bus Accident: Amid Probe, Viral Video Shows Another BEST Driver Buying Liquor From Wine Shop In Mumbai's Andheri shocking video viral
मुंबईत हे काय चाललंय? बेस्ट चालकाने बस थांबवली, वाईन शॉपवरुन दारु घेतली; कुर्ला अपघातानंतर दुसरा धक्कादायक VIDEO व्हायरल
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

काय आहे व्हिडीओमध्ये?

सुषमा अंधारेंनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये रस्त्याच्या कडेला एक पोलीस व्हॅन उभी असून त्या व्हॅनच्या आडोशाला काही पोलीस काही व्यक्तींशी बोलत असल्याचं दिसत आहे. हा प्रकार पुण्यातला असल्याचं सुषमा अंधारेंनी म्हटलं आहे. काही वेळाने त्या लोकांनी पोलिसांना काही पाकिटं दिली आणि ही पाकिटं घेऊन पोलीस व्हॅनच्या आत गेले. आतमध्ये कैदी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ऐन दिवाळीत सदावर्तेंकडून एसटी बंदचा इशारा, सुषमा अंधारे म्हणल्या; “फडणवीसांचा बोलका बाहुला…”

नेमका हा काय प्रकार आहे, यासंदर्भात अद्याप कोणताही खुलासा पोलिसांकडून करण्यात आला नसून सुषमा अंधारेंनी मात्र थेट देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत विचारलेला सवाल चर्चेचा विषय ठरला आहे.

Story img Loader