मी मंगळवारी पत्रकार परिषदेत मी शंका व्यक्त केली होती की लोकशाहीचा खून करण्यासाठी यांचं काही कट-कारस्थान चाललं आहे का? राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यातच हा निकाल आम्हाला अपेक्षित होता असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. आज अध्यक्षांनी पक्षांतराचा राजमार्ग काय ते दाखवून दिलं आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. लवाद म्हणून राहुल नार्वेकर बसले होते किंवा त्यांना बसवलं होतं. त्यांची वागणूक सगळी मिलिभगत दाखवणारी होती. राहुल नार्वेकरांनी दोन-तीन पक्ष बदलले आहेत, त्याचाच राजमार्ग दाखवून दिला असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश पायदळी तुडवले

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश दिशादर्शक असतात. ते ऐकले गेले पाहिजेत. मात्र आज राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला आहे ते निर्देश पायदळी तुडवले. आमच्या मागे महाशक्ती आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयालाही जुमानत नाही हेच आजच्या निकालाने दाखवून दिलं आहे. त्यांनी अपात्र कुणालाच केलं नाही. आमची घटना ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला अपात्र का केलं नाहीत? शिवसेना कुणाची हे महाराष्ट्रातलं लहान मूलही सांगेल. मात्र निर्णय देताना त्यांचा पायाच चुकला आहे. निर्लज्जपणाचा कळस राहुल नार्वेकरांनी गाठला आहे.

Image Of India Alliance Leaders.
AAP vs Congress : “तर काँग्रेसला इंडिया आघाडीतून बाहेर काढायला लावू”; काँग्रेसला भाजपाकडून निधी, आपचे गंभीर आरोप
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं? (फोटो सौजन्य पीटीआय)
BJP vs Congress : डॉ. आंबेडकरांच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा वार अन् भाजपाचा पलटवार, दिल्लीत एनडीएच्या बैठकीत काय ठरलं?
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
Satish Wagh murder case, Satish Wagh Wife ,
सतीश वाघ खून प्रकरणात पत्नी सामील, मारेकऱ्यांना पाच लाखांची सुपारी; पत्नी गजाआड
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Important update regarding municipal elections in Maharashtra state
राज्यातील महापालिका निवडणुकीबाबत महत्वाची अपडेट, बावनकुळे म्हणाले…

हे पण वाचा- एकनाथ शिंदेंचे सर्व आमदार पात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा मोठा निर्णय, उद्धव ठाकरेंसमोर नवा पेच

राहुल नार्वेकरांनी गैरफायदा घेतला

राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला आहे त्याविरोधात अवमान याचिका बहुदा दाखल करता येणार नाही. त्याचाच त्यांनी गैरफायदा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व शिल्लक राहणार की नाही? हे आता बघावं लागेल. सर्वोच्च न्यायालय स्वतःहून कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं असेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले. यापुढे सर्वोच्च न्यायालयात अशा केसेस आल्या त्यात या लवादाचा निर्णय मानला जाणार का? हे बघावं लागेल असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

२०१८ मधली माझी नियुक्ती त्यांना अमान्य ठरवण्याचा अधिकारच राहुल नार्वेकरांना नाहीच. जर ती घटना मान्य नव्हती तर मग गद्दार कुणाच्या चिन्हावर निवडून आले? जे.पी. नड्डा अध्यक्ष आहेत त्यांना काहीच अधिकार नाही. आज अध्यक्ष जे बोलले आहेत त्याला काही अर्थ नाही. त्यांनी आधी वेळकाढूपणा केला. पहिल्याच दिवशी ते हा निकाल देऊ शकत होते. मात्र त्यांनी उगाचच वेळ काढला आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच निवडणुकीच्या आधी दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे अशीही मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.

गद्दाराची शिवसेना आणि मिंध्यांची शिवसेना महाराष्ट्र मान्य करणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. शिंदेंची शिवसेना ही शिवसेना होऊच शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी १२ जानेवारीला येत आहेत. याचाच अर्थ ही सगळी मॅच फिक्स होती हे लक्षात येतं आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. कायद्याप्रमाणे निकाल दिलेलाच नाही, हा निकाल सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही जनता हा निर्णय कधीच मान्य निर्णय करणार नाही असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

Story img Loader