महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा असताना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मोठं विधान केलं आहे. एकीकडे सर्वत्र १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा चर्चेत असताना अनिल परब यांनी मात्र १६ नसून ३९ आमदारांचा हा मुद्दा असल्याचं नमूद केलं आहे. यासंदर्भात माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी आपली भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले अनिल परब?

“आता निकालाची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. कोर्ट काय निकाल देईल हे कुणालाच माहिती नाही. पण आम्ही जी बाजू मांडली आहे, त्यात फक्त १६ आमदार नसून १६ आणि २३ अशा ३९ आमदारांच्या अपात्रतेचा तो मुद्दा आहे. भारतीय घटनेत परिशिष्ट १० नुसार अपात्रतेच्या कारणात हे सगळे लोक कसे बसतात, हे आम्ही कोर्टाला पटवून दिलं आहे. आमचं म्हणणं कोर्टानं ग्राह्य धरलं, तर आमच्या बाजूने लागेल”, असं अनिल परब म्हणाले.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Action will be taken against employees who refuse election work
निवडणूकीचे काम नाकारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
sagar meghe and Sameer meghe
सागर मेघेंवर बंधूसह अन्य दोघांची जबाबदारी; हिंगण्यात हजेरी पण वर्धा, देवळीत प्रतीक्षाच
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : जोरगेवारांनी थेट फडणवीसांसमोरच व्यक्त केली मुनगंटीवारांवरील नाराजी; म्हणाले, “उमेदवारी मिळू नये म्हणून…”
Extravagance of one lakh crores by rulers party in state Priyanka Chaturvedis allegation
राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून एक लाख कोटीची उधळपट्टी, ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांचा आरोप
himachal pradesh cm sukhvinder singh sukhu
मुख्यमंत्र्यांसाठीचे सामोसे खाल्ले कुणी? CID करतेय चौकशी; राज्यभर त्याचीच चर्चा!

संजय राऊतांनी अजित पवारांच्या ‘त्या’ विधानावर दिलं प्रत्युत्तर; म्हणाले, “असं कुणी कसं म्हणू शकेल?”

“अध्यक्षांनाच हा अधिकार आहे. पण अध्यक्षच वादात आहेत, त्यंनाच चुकीच्या पद्धतीने बसवलं गेलं आहे, अपात्रतेच्या छायेखालच्या आमदारांनी त्यांना मतदान केलं म्हणून ते बसले आहेत. नबम राबिया खटल्यात म्हटलंय की जेव्हा अध्यक्ष वादात असतात, तेव्हा त्यांच्याकडे अशी प्रकरणं न पाठवता सर्वोच्च न्यायालयाने त्या केसेस ऐकायला हव्यात”, असं अनिल परब यांनी यावेळी नमूद केलं.

कोणत्या आमदारांचा खटल्यात उल्लेख?

शिंदे गटाच्या एकूण १६ आमदारांचा खटल्यात अपात्रतेसंदर्भात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये…

एकनाथ शिंदे

अब्दुल सत्तार

तानाजी सावंत

यामिनी जाधव

संदिपान भुमरे

भरत गोगावले

संजय शिरसाट

लता सोनावणे

प्रकाश सुर्वे

बालाजी किणीकर

बालाजी कल्याणकर

अनिल बाबर

महेश शिंदे

संजय रायमुलकर

चिमणराव पाटील

रमेश बोरणारे

या आमदारांचा समावेश आहे.