दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची खेडमध्ये सभा झाली होती. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खेडमध्ये त्याच गोळीबार मैदानावर सभा होणार असून त्याबाबत दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. ठाकरे गटाकडून या सभेची खिल्ली उडवली जात असताना शिंदे गटाकडून ही सभा रेकॉर्डब्रेक होणार असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर खेडमधील माजी आमदार आणि ठाकरे गटाचे नेते संजय कदम यांनी रामदास कदमांवर टीकास्र सोडलं आहे.

संजय कदम यांनी नुकताच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. आज एकनाथ शिंदेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर टीव्ही ९ शी बोलताना संजय कदम यांनी खोचक शब्दांत रामदास कदमांना लक्ष्य केलं आहे. तसेच, त्यांनी रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनाही सल्ला दिला आहे.

Sanjay Raut Brother Post News
Sanjay Raut Brother : संजय राऊत यांच्या सख्ख्या भावाची पोस्ट चर्चेत; डिलिट करत म्हणाले, “मी..”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
daughter in law hugs mother-in-law tightly
अगंबाई…! सुनबाईंची सासूबाईंना कडकडून मिठी; VIDEO ची एकच चर्चा
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sunny Deol Confirms His Role in Ramayana
नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात काम करण्याबाबत सनी देओलकडून भूमिका स्पष्ट; म्हणाला, “हा चित्रपट ‘अवतार’प्रमाणे…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”

“रामदास कदमांच्या डोळ्यांवर झापड”

रामदास कदमांच्या डोळ्यांवर झापड असल्याचं संजय कदम म्हणाले. “खेडच्या सभेला आलेल्या स्थानिक लोकांना सगळं माहिती आहे. कदाचित रामदास कदमांच्या डोळ्यांवर झापड आहे. मतदारसंघातले लोक त्यांना ओळखत नाहीत. त्यांचे सख्खे भाऊ, त्यांचे पुतणे, त्यांच्या गावातले सरपंच, त्यांचे शाखाप्रमुख हे सगळे सभेला होते. त्यांना जर हे लक्षात येत नसेल, तर स्थानिक काय, बाहेरचे काय? त्यामुळे रामदास कदम यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे”, असं संजय कदम म्हणाले आहेत.

“किल्ला कधीच हातातून निसटलाय”

“खेड म्हणजे रामदास कदम यांचा बालेकिल्ला म्हटलं जायचं. पण आता फक्त रामदास कदम नावाचा बाल्या शिल्लक आहे. बाकी किल्ला कधीच त्यांच्या हातातून गेला आहे. तो किल्ला हातातून गेल्यामुळेच रामदास कदम सातत्याने काहीतरी बोलत असतात. योगेश कदम कधी गावचा सरपंच झालेला नाही, पंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य झालेला नाही. मी जिल्हा परिषद सदस्य, पंचायच समिती, सरपंच ते आमदार झालो आहे”, असंही संजय कदम यांनी यावेळी म्हटलं.

“योगेश कदमच्या पाठिशी चार वर्षं बाप आहे. त्याला खेडमधलं काय माहिती आहे? रामदास कदमचा बाप, त्याचा पर्यावरणातला लुटलेला पैसा याच्यातून त्यांची आमदारकी आहे ना. तुम्ही चालवलेली नाटकं लोकांना माहिती आहे. आता तुझी आमदारकी बघ. शिवसैनिक होते म्हणून तुला आमदारकी मिळाली. आता तुला उद्धव ठाकरे गटाची माणसं नकोच आहेत. तुझ्या पाठिशी आहे कोण?” असा सवाल त्यांनी योगेश कदम यांना केला आहे.

रामदास कदमांना आव्हान

“रामदास कदम २००९ ला खेडमधून पराभूत झाले. भास्कर जाधवबरोबर खेड, गुहागर जोडला आहे. भास्कर जाधवांनी यांचा दारूण पराभव केला आहे. आता तर डिपॉझिटही जाईल. दुसऱ्या-तिसऱ्याची नावं सांगण्यापेक्षा रामदास कदमनीच तिथून भास्कर जाधवांच्या विरोधात उभं राहून दाखवावं”, असं आव्हानदेखील संजय कदम यांनी रामदास कदम यांना दिलं आहे.

Story img Loader