केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठविण्याच्या निर्णय घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी ‘फेसबुक’द्वारे जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर टीका करतानाच आपली यासंदर्भातील भूमिका स्पष्ट केली. निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली तीन पर्यायी नावं आणि तीन पर्यायी निवडणूक चिन्हं यासंदर्भातही उद्धव यांनी भाष्य केलं. उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर विरोधकांकडूनही प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मात्र उद्धव ठाकरे आपल्या या फेसबुक लाइव्ह दरम्यान नेमकं काय म्हणाले? वाचा त्यांचं संपूर्ण भाषण जसच्या तसं…
नक्की वाचा >> उद्धव विरुद्ध शिंदे वादात राज ठाकरे ट्रोल! रात्री आठनंतर ‘गुड मॉर्निंग’ अन् देशपांडे, काळे, शालिनीताईंना आवरण्याचा सल्ला
आज देखील अनेक जण भेटतात म्हणतात तुम्ही कुटुंबीयच आहात. आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधतोय. गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा पण आपण संवाद केला. सगळं देऊनही गद्दार गेले. आता जरा अति होऊ लागलं आहे. मलाच मुख्यमंत्री व्हायचय इथंपर्यंत ठीक होतं आता शिवसेनाप्रमुख व्हायला चालले. सगळ्यांना धन्यवाद दसरा मेळाव्यात विघ्न आणले. पण आपला दसरा मेळावा झालाच. दोन मेळावे झाले असं म्हणतात एकीकडे पंचतारांकित तर दुसरीकडे निष्ठावंतांचा मेळावा दिव्यांग, नेत्रहीन सगळे शिवसैनिक होते त्यांना धन्यवाद. तुम्ही आलात ते का? कारण उध्दव बाळासाहेब ठाकरे म्हणून तुम्ही आलात. १९ जून १९६६ तो काळ आजही आठवतो. घरी मराठी माणसांची वर्दळ. मार्मिकमध्ये तेव्हा वाचा आणि थंड बसा हे सदर होतं तेव्हा. आजोबांनी बाळासाहेबांना विचारले संघटना काढायचे ठरवले का? आजोबांनी नाव दिले ‘शिवसेना’. पुढे हा ५६ वर्षांचा इतिहास आपल्या समोर. एक दिवस एक तगडा माणूस उभा ते दत्ताजी साळवी काही नसतांना लोक जुळत गेली. काहीच नव्हतं केवळ महाराष्ट्राच्या हितासाठी माझा सिंहाचा खारीचा वाटा उचलणार म्हणून लोक जुळली. वसंतराव मराठे ठाण्यात निवडून आले, अनेक जण अनेकांची नावे. त्यातून शिवसेनेचा विजयरथ पुढे निघाला. पहिल्यांदा ४२ नगरसेवक.
अनेक जणांनी जीव पण गमावले, तुरुंगवास सोसला, पोलिसांशी संघर्ष त्यातून शिवसेनेचा महावृक्ष. काल निवडणुक आयोगाने चिन्ह धनुष्यबाण गोठावला. चाळीस डोक्यांच्या रावणांनी ते गोठवलं. या लोकांच्या वृत्तीची चीड येते. आईच्या काळजात कट्यावर घुसवली. त्यांच्या मागच्या ‘महाशक्ती’ला जास्त आनंद कारण त्यांना जमलं नाही त्यांनी शिवसेनेची लोक फोडून आनंद घेताहेत. या देशात हिंदू म्हणायची हिंम्मत दिली तीच शिवसेना गोठावली काय आनंद मिळवलात? तुमचा आणि शिवसेनेचा संबंध काय? माझ्या आजोबांनी नाव दिलं आहे. बाळासहेबांनी रुजवलं आहे. आज अनेकांचे फोन आले. सकाळी ९-९.३० वाजता नारळ फुटला त्याचे तुषार अंगावर आले. मला त्या पाण्याने इतके भिजवले की अनेक जबाबदाऱ्या मी स्वत:ला सांभाळल्या. आज शिवसैनिकांच्या अश्रुने भिजलोय.
नक्की वाचा >> आता ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’ नावावरुन शिंदे आणि ठाकरेंमध्ये वादाची शक्यता; मात्र हे नाव ठाकरेंना मिळण्याची शक्यता अधिक कारण…
त्यांचा उद्देश त्यांना तरी समजला? यांचा उपयोग संपला की यांना फेकून देतील. मला खात्री आहे सगळेच काही स्वार्थी नाहीत हे दसरा मेळाव्यात सिध्द झालं. शिवसैनिकांना दमदाट्या इंदिरा गांधीनी जे केले नाही ते तुम्ही केलं आहे. ही बाळासाहेबांची आठवण आहे. तेव्हाही त्रास झालाच पण तेव्हा काँग्रेसचे सरकार होते. आज भाजपाचे मग जे काँग्रेसने केले नाही ते तुम्ही करता. शिवसैनिकांना ज्यांनी तुम्हाला मोठे केले त्यांना छळत आहात. मी डगमगलेलो नाही. माझा आत्मविश्वास आहे. तुमच्यासारखे शिवसैनिक आहेत. तुम्ही डगमगायचे नाही. अनेकांना फोन येतात. माझं आजही आव्हान आहे समोर या निवडणुकांना सामोरे जा. तुम्हाला सगळं हवं आहे पण बाळासाहेबांचा मुलगा नकोय.
काही काळासाठी चिन्ह गोठवलं आहे. मला हा निकाल अनपेक्षित होता. १६ आमदारांचा निकाल लागेपर्यंत आयोगाचा निर्णय व्हायला नको होता. माझ्या कायद्यावर विश्वास आहे. तिथे न्याय मिळेल अशी खात्री.
आपण तीन चिन्हं दिली आहेत. त्रिशूळ, उगवता सूर्य, धगधगती मशाल. तीन नावे दिली आहेत, ‘शिवसेना बाळासाहेब ठाकरे’, ‘शिवसेना प्रबोधनकार ठाकरे’, ‘शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे’. आदेशाप्रमाणे चिन्ह नाव दिलं आहे. लवकरात लवकर आम्हाला नाव द्यावे. आयोगाने आपण दिलेले पर्याय जाहीर केले पण गद्दारांनी काय दिलं आहे ते अद्याप सांगितलेले नाही. जनता सर्वोच्च आहे. आम्हाला त्यांच्या दरबारात जायचे आहे म्हणून निवडणूक आयोगाने लवकरात लवकर आम्हाला चिन्ह आणि नाव द्यावे. आज कोजागिरी आहे रात्र वैऱ्याची आहे जागृक राहा. आज वेळ निघून गेली की कुणी आपल्याला कुणी हरवणार नाही.