राजापूर : राजापूर तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींपैकी ४ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाने वर्चस्व राखल्याचा दावा केला आहे, तर भालावली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला भाजपाच्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला.
तालुक्यातील १० ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी ५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ५ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होऊन सोमवारी मतमोजणी झाली. या निवडणुकांचा ग्रामपंचायतनिहाय निकाल पुढीलप्रमाणे-
सर्व विजयी उमेदवार- राजवाडी- सरपंच- अजित बंडबे, सदस्य- किरण बंडबे, सुनील वाघरे, आर्या लाड, माधुरी गिरकर, शालिनी जाधव, आरोही जाधव, सागर जाधव.
आंगले- सरपंच- श्रीधर सौंदळकर, सदस्य- वासुदेव गराटे, दत्तात्रय राऊत, संस्कृती सौंदळकर, विजय राऊत, गौतमी जाधव, सेजल पांचाळ, प्रगती राऊत.
भालावली- सरपंच- प्रकाश घवाळी, सदस्य- रामचंद्र झोरे, प्रणोती केळवाडकर, अनघा सिनकर, प्रवीण जाधव, अश्विनी हळदणकर, उषा मराठे, सूर्यकांत साळवी, विलास गुरव, सुवर्णा गुरव.
कोंडय़ेतर्फ सौंदळ- सरपंच- मीनल तळवडेकर, विजय आगटे, हेमंत उपळकर, समीक्षा शिवगण, महेश कारेकर, विजया तळवडेकर, प्रतीक्षा भातडे, साक्षी हर्डीकर, प्रतीक्षा घाणेकर, संतोष टक्के.
सागवे- सरपंच- सोनाली टुकरूल, मसूद शेख, मर्यमबी बोरकर, रझिया बगदादी, मधुकर जोशी, संदेश बोटले, साक्षी मांजरेकर, कृष्णकांत मोंडे, योगिता नाकटे, नीलाक्षी येरम, मंगेश गुरव, संपदा नार्वेकर, अनुष्का राणे, बोरकर अब्दुल रज्जाक अब्दुल लतीफ, जुनेद मुल्ला, परवीन बोरकर.
जोरदार घोषणाबाजी आणि फटाक्यांची आतषबाजी करत शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी विजयाचा जोरदार जल्लोष केला.