मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी अयोध्या दौऱ्यावर होते. त्यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते देखील उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत, राम मंदिराच्या निर्माणाची पाहणी केली. दरम्यान, त्यांच्या या अयोध्या दौऱ्यावरून ठाकरे गटाने शिंदे गट-भाजपाला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातले आहे व शेतकरी हवालदिल झाला आहे आणि तिकडे संपूर्ण सरकार अयोध्येत उत्सवात अडकून पडले. हे काही रामराज्याचे चित्र नाही, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.

हेही वाचा – “काहींना माईक हातात आल्यावर…”, ‘त्या’ विधानांवरून अजित पवारांचा उद्धव ठाकरेंसह फडणवीसांवर निशाणा

Uddhav Thackeray on Eknath Shinde
Uddhav Thackeray: “मिंध्या तू मर्दाची…”, एकनाथ शिंदेंवर टीका करताना उद्धव ठाकरेंचं आक्षेपार्ह विधान; वाचा काय म्हणाले?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Eknath Shinde On Uddhav Thackeray :
Eknath Shinde : “बंद सम्राटांना कायमचं…”, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मुंबईच्या सभेतून इशारा
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Uddhav Thackeray on Pranpratishtha
Uddhav Thackeray on Ram Mandir : “राम मंदिर गळनेका थांबेगा तो…”, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामुळे एकच हशा!
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…

ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलंय?

श्रीरामांच्या सुटकेसाठी व अस्मितेसाठी जो लढा झाला, त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे शिवसेनेचे अयोध्येशी एक भावनिक नाते आहे. यापुढेही ते नक्कीच राहील. आता जे लोक अयोध्येत जाऊन नकली शिवसेनेचा जयजयकार करत आहेत, ते ढोंग व खोक्यांतून निर्माण झालेला अहंकार आहे. अयोध्येतील रामदरबारी पाप आणि अहंकारास थारा नाही, हे त्यांना भविष्यात कळून येईल, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

“…ते रामनामास लांच्छन आहे”

श्रीरामांनी ज्या प्रकारे राज्य केले त्यास रामराज्य म्हणावे लागेल. संस्कृती, संस्कार व सदाचाराची चर्चा होते, तेव्हा तेव्हा श्रीरामांचे नाव घेतले जाते. राम हे आपल्या जीवनाचा भाग आहेत व तो कुणालाच दूर करता येणार नाही, पण जे मनाने श्रीरामांचे नाहीत ते बिनकामाचे अयोध्येत जाऊन काय करणार? श्रीरामांच्या दरबारात सत्य व इमान यांचाच बोलबाला असतो, पण रामनाम भ्रष्ट करून स्वतःची राजकीय भाकरी शेकण्याचा जो प्रयत्न सध्या महाराष्ट्र आणि देशात सुरू आहे, ते रामनामास लांच्छन आहे, असेही ते म्हणाले.

“भाजपालाही केलं लक्ष्य”

यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्यावरून भाजपालाही लक्ष्य केलं. गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा’ या उक्तीप्रमाणे भाजपही अयोध्या यात्रेत सामील झाला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी यात्रेची चोख व्यवस्था केली. बेइमानांसाठी पायघड्या घालणे ही भाजपाची संस्कृतीच आहे व त्याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. असे ते म्हणाले.

“हे श्रीरामांच्या कार्यपद्धतीशी सुसंगत नाही”

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातले आहे व शेतकरी हवालदिल झाला आहे आणि तिकडे संपूर्ण सरकार अयोध्येत उत्सवात अडकून पडले. हे काही रामराज्याचे चित्र नाही. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात बळीराजावर अवकाळीचा कहर झाला आहे. गहू अक्षरशः जमिनीवर आडवा झाला. सांगलीत द्राक्ष, संत्रा, हरभरा, कलिंगड असे सगळे पीक नष्ट झाले. मिरची, कांदा, आंबा, भाजीपाला नष्ट झाला. बुलढाण्यात कांद्याचे अतोनात नुकसान झाले. अनेक भागांत घरादारांचे नुकसान झाले. या नुकसानीवर उपाय शोधण्याऐवजी सरकार महाराष्ट्रातून गायब झाले व अयोध्येत यात्रा-उत्सवांत अडकून पडले. श्रीरामांच्या कार्यपद्धतीशी हे सुसंगत नाही, अशी टीकाही ठाकरे गटाने केली.

हेही वाचा – हिंदूत्वविरोधकांचा अंत समीप; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा काँग्रेस-ठाकरे गटाला टोला

“चोरलेल्या धनुष्याने शौर्य गाजवता येत नाही”

आज जे अयोध्येत जाऊन रामनामाचा जप करीत आहेत, त्यांच्या तोंडात राम, पण बगलेत खंजीर आहे. श्रीरामांच्या दर्शनाने त्यांचे पाप धुतले जाईल की नाही ते माहीत नाही, पण त्यांना सुबुद्धी मिळो व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर होणारे रावणी हल्ले परतवून लावण्याचे बळ मिळो. अर्थात गुडघे टेकणाऱ्या मिंध्यांकडून ही अपेक्षा करणे चूकच आहे. चोरलेल्या धनुष्याने शौर्य गाजवता येत नाही, असे ते म्हणाले.