नवी मुंबईत आज ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं, बटणं दाबलं की सुरू होतं” अशी मिश्किल टीप्पणी सावंत यांनी केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अलीबाबा’ असून बाकीचे ४० चोर असल्याचं सांगत सावंत यांनी बंडखोरांवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनी नवरात्र, गणेशोत्सवात मंडळाना दिलेल्या भेटीवरूनही यावेळी सावंत यांनी टीकास्र डागलं आहे. दिल्लीत धारावीच्या पूर्नविकासाच्या प्रकल्पाचा करार राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत नाही, तर उपमुख्यमंत्र्यांसोबत होतो, असं सांगत त्यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सीबीआयचे खटले दाखल आहेत. त्यामुळे पहिले मुख्यमंत्र्यांना तडीपार करा, अशीही मागणी सावंत यांनी पोलीस प्रशासनाकडे यावेळी केली आहे.
“तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना…”, विनायक राऊतांचा पोलिसांवर गंभीर आरोप
कोकण दौऱ्यावरुन परतल्यानंतर सावंत यांनी राणे कुटुंबियांवरदेखील हल्ला चढवला. “कोकणातल्या कुटुंबात सर्वच सुक्ष्म आहेत. सुक्ष्म म्हटल्यावर अधिक बारकाई असा अर्थ होतो. पण सुचतच नाही अशा माणसाला. ही माणसं शिवसेनेला नेस्तनाबूत करणार का?” असा सवाल त्यांनी यावेळी केला. पक्षातून बाहेर पडल्यानंतर राणेंनी राजकारणात ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ केला, असा टोलाही सावंत यांनी यावेळी लगावला.
“शिंदे गटातील काही आमदारांना पश्चात्ताप, लवकरच…,” जयंत पाटील यांचा मोठा दावा
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी नवी मुंबई पोलिसांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. “खासदार राजन विचारे यांचं संरक्षण काढलं. भास्कर जाधव यांनी टीका केल्यावर त्यांचंही मध्यरात्री संरक्षण काढलं. शिवसैनिक कधीच पोलिसांच्या संरक्षणात चालत नाही आणि वाढत नाही. आम्ही रजनी पटेलला जागा दाखवली, तुम्ही मिंधे सरकारचे गोडवे गाऊ नका. तुम्ही कायद्याचे रक्षणकर्ते आहात”, अशा शब्दात राऊत यांनी पोलिसांना सुनावलं.