Shiv Sena (UBT) Chief Uddhav Thackeray Hospitalized at Reliance Hospital : शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात ते गेले होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीविषयी शिवसैनिकांनी चिंता व्यक्त केली होती. परंतु, आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या प्रकृतीविषयी आता माहिती दिली आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आदित्य ठाकरे एक्स या मायक्रोब्लॉगिंग साईटवर पोस्ट करत म्हणाले, “आज सकाळी उद्धव ठाकरे यांची सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणी झाली. तुमच्या शुभेच्छांमुळे सर्व काही ठीक आहे. आणि ते कामावर परतण्यासाठी आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे तयार आहेत.”
This morning, Uddhav Thackeray ji did a pre planned detailed check up at the Sir HN Reliance Hospital.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 14, 2024
With your best wishes, All is well, and he is fully ready to get to work and serve the people.
तीन वर्षांपूर्वी मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती
मानेच्या दुखण्यावरील उपचारांसाठी उद्धव ठाकरे यांच्यावर १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एच. एन. रिलायन्स रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर सर्व्हायकल स्पाईन संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंची फिजिओथेरेपी सुरू करण्यात आली. या दुखण्यातून सावरण्यासाठी त्यांना अनेक आठवडे लागले होते.
हेही वाचा >> Uddhav Thackeray Hospitalized : उद्धव ठाकरेंची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
दसरा मेळाव्यातून महायुतीवर केलेला हल्लाबोल
दोन दिवसांपूर्वी दसरा मेळाव्यानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली होती. “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहे. आज शस्त्रपूजन आणि सरस्वती पूजन होत असतं. प्रत्येकाकडे वेगळी शस्त्रं असतात. कुणाकडे गन आहे, कुणाकडे अजून काय आहे. आमच्याकडे लढवय्या मन आहे” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. तसेच त्यांनी यावेळी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख म्हणाले होते, आम्ही आज (१२ ऑक्टोबर) शस्त्रपूजा केली त्यात बाकी शस्त्र आहेतच, पण शिवसेना प्रमुखांच्या कुंचल्याची (व्यंगचित्र काढण्यासाठी वापरला जाणारा ब्रश) पूजाही आम्ही केली. आता तुम्हा सगळ्यांची पूजा करतो आहे. कारण तुम्ही सगळेजण शिवसेनेची शस्त्रं आहात. एकीकडे अब्दालीसारखी माणसं, यंत्रणा, केंद्रात सत्ता असं सगळं आहे. यांनी मनसुबा आखला आहे की उद्धव ठाकरेंची सेना संपवा. पण ही शिवसेना नाही ही वाघनखं आहेत जी माझ्यासमोर बसली आहेत.