महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यभरामध्ये झालेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात भाष्य करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांबरोबरच भाजपालाही लक्ष्य केलं आहे. महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी केलेल्या बंडखोरीनंतर ९ दिवसांमध्ये ते ४० बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने भाजपाची मदत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेल्या या बंडखोर आमदारांनी महिन्याभरामध्ये अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीची घडी बसवण्यामध्ये पुढाकार घेणाऱ्या शरद पवारांवर अनेकदा टीका केली. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून शिवसेना संपवण्याचा आरोप बंडखोरांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये आणि सभांमधून केला. मात्र आता पवारांनी शिवसेना संपवल्याच्या याच आरोपांवर पक्षप्रमुख उद्धव यांनी भाष्य केलं आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नक्की पाहा >> Photos: आता बाळासाहेबांवरुन शिवसेना विरुद्ध मनसे? सूचक विधान करत म्हणाले, “बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या…”
आधी भाजपासोबत त्रास नंतर महाविकास आघाडीचा त्रास
उद्धव ठाकरेंनी बंडखोरांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याच्या मुद्द्यावरुन टीका केली. “आधी भाजपासोबत युतीत होतो तर भाजपा त्रास देतेय. भाजपा त्रास देते होती शिवसेनेला खोटं ठरवत होती. आपल्यासोबत ठरवलेल्या गोष्टी नाकार होती म्हणून महाविकास आघाडीला जन्म दिला तर काँग्रेस, राष्ट्रवादीवाले त्रास देत आहेत म्हणायला लागले, मग नेमकं तुम्हाला हवं तरी काय?” असा प्रश्न उद्धव यांनीच विचारला. यावर राऊत यांनी, माझाही हाच प्रश्न आहे की त्यांना नक्की काय हवंय? असं म्हणत उद्धव यांना बंडखोऱ्यांच्या मागण्याबद्दल विचारलं.
नक्की पाहा >> ‘सत्ता होती तेव्हाची’ आणि ‘सत्ता गेल्यानंतर’च्या मुलाखतीमधील फरक दाखवत निलेश राणेंनी सेनेला केलं लक्ष्य; कॅप्शन चर्चेचा विषय
शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करु लागले
उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना सत्तेची चटक लागल्याची टीका केली. “त्यांना लालसा आहे. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्रीपद हवं होतं. ते त्यांनी अत्यंत वाईट पद्धतीने मिळवलं. ही आमची शिवसेना म्हणत शिवसेनाप्रमुखांबरोबर तुलना करु लागले,” असं म्हणाले. यावर राऊत यांनी, “शिवसेनाप्रमुखांशी कधी तुम्ही सुद्धा तुलना केलेली नाही,” अशी प्रतिक्रिया नोंदवली. “त्यांनी केली पण हे पाहिल्यानंतर मला नाही वाटतं भाजपा कधी पुढे त्यांना स्वत:च्या पक्षात घेतील. नाहीतर ते पुढे कधीतरी नरेंद्रभाईंबरोबर तुलना करायला लागतील स्वत:ची आणि पंतप्रधान पद मागतील,” असा खोचक टोला उद्धव यांनी लगावला. “लालसा फार घाणेरडी गोष्ट असते. त्याला आपण चटक म्हणू शकतो. मला एका गोष्टीचं समाधान नक्कीच आहे मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो पण मला सत्तेची चटक नाही लागली. सत्तापिपासूपणा एकदा का रक्तात भिनला की तुम्ही कोणाचे नसता आणि कोणी तुमचं नसतं. तेच त्यांचं झालेलं आहे,” अशा शब्दांमध्ये उद्धव यांनी टीका केली.
नक्की वाचा >> Video: “…नाहीतर आमचाच ‘कार्यक्रम’ झाला असता”; गळ्यावरुन हात फिरवत जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं विधान
पवारांनी शिवसेना संपवल्याच्या आरोपांवर उद्धव म्हणतात…
शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर, सांगोल्याचे शहाजीबापू पाटील यांच्यासहीत रामदास कदम यांच्यासारख्या अनेक आजी-माजी नेत्यांनी निधीचा मुद्दा उपस्थित करण्याबरोबरच शरद पवारांनी शिवसेना संपवल्याचा आरोप केला होता. या आरोपांना उद्धव यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे. “फुटीरांचा असा एक आक्षेप आहे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करुन शिवसेना संपवली,” असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारला. त्यावर उद्धव यांनी, “मग आता जे गावोगावी दिसतंय ते काय आहे?” असा प्रश्न विचारला.
आमदार, खासदार गेले तेव्हा काय वाटलं…
“आमदार गेले आणि आता काही खासदार गेले,” असं म्हणत राऊत यांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर उत्तर देताना, “हे गेल्या निवडणुकीमध्ये पडले असते तर काय झालं असतं. हे गेल्या निवडणुकीत पडले असते ते अडीच वर्षांनी पडले असं मी समजतो,” असं माजी मुख्यमंत्री म्हणाले.