महाराष्ट्रामध्ये मागील महिन्यभरामध्ये झालेल्या राजकीय घडामोडींसंदर्भात भाष्य करताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांबरोबरच भाजपालाही लक्ष्य केलं आहे. महाविकास आघाडीमधील नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी केलेल्या बंडखोरीनंतर ९ दिवसांमध्ये ते ४० बंडखोर आमदारांच्या पाठिंब्याने भाजपाची मदत घेऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडीमधून बाहेर पडलेल्या या बंडखोर आमदारांनी महिन्याभरामध्ये अनेकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीची घडी बसवण्यामध्ये पुढाकार घेणाऱ्या शरद पवारांवर अनेकदा टीका केली. शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री बनवून शिवसेना संपवण्याचा आरोप बंडखोरांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये आणि सभांमधून केला. मात्र आता पवारांनी शिवसेना संपवल्याच्या याच आरोपांवर पक्षप्रमुख उद्धव यांनी भाष्य केलं आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नक्की पाहा >> Photos: आता बाळासाहेबांवरुन शिवसेना विरुद्ध मनसे? सूचक विधान करत म्हणाले, “बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा