महाविकास आघाडीतील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी सूरत गाठले आणि राज्यातील नाट्यमय घाडमोडींनंतर नऊच दिवसात ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मदतीने भाजपाचा पाठिंबा घेऊन शिंदेंनी राज्यात सरकार स्थापन केलं. मात्र या बंडखोरीची माहिती सर्वात आधी समोर आली तेव्हा शिंदेंची समजून घालण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक हे दोन नेते सूरतला गेले होते. मात्र त्यांना यामध्ये यश आलं नाही. त्यानंतरच्या सत्तानाट्याच्या पार्श्वभूमीतून सरकार स्थापन झाल्यावर अगदी आदित्य ठाकरेंना पाठवण्याची तयारी दर्शवण्यात आली होती असा दावाही बंडखोरांपैकी काहींनी केला. मात्र आता त्यावेळेस थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच सूरतला गेले असते तर चित्र वेगळं असतं असा दावा करणाऱ्यांना उद्धव ठाकरेंनीच उत्तर दिलं आहे. अत्यंत अनपेक्षितरीत्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हायला लागल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच जाहीर मुलाखतीद्वारे व्यक्त झाले आहेत. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे.
नक्की पाहा >> Photos: आता बाळासाहेबांवरुन शिवसेना विरुद्ध मनसे? सूचक विधान करत म्हणाले, “बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आणि राज ठाकरेंच्या…”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा