सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे पागल झाले आहेत अशी बोचरी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. रात्री उशिरा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंबाबत आणि राम मंदिराविषयी प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्यांनी उद्धव ठाकरेंना वेड लागलं आहे असं म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय म्हणाले नारायण राणे?

“उद्धव ठाकरे पागल झाले आहेत. भाजपाची सत्ता आल्यानंतर म्हणजेच २०१४ नंतर राम मंदिर निर्मितीचं काम सुरु झालं आणि आता ते पूर्ण होतं आहे. राम मंदिर कुणी बांधलं ते उद्धव ठाकरेंना वगळून देशाच्या १४० कोटी जनतेला ठाऊक आहे. उद्धव ठाकरेंना चांगलं काहीही दिसत नाही, चांगलं बोलता येत नाही. त्यामुळेच मी म्हणतो की त्याला (उद्धव ठाकरेंना) वेड लागलं आहे. त्यांची सत्ता गेल्याने आता ते काय बोलतात ते त्यांचं त्यांनाही कळत नाही.” असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली.

राम कुणाचीही प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही

राम मंदिर ही भाजपाची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी सोमवारी विचारला होता. त्याबाबत विचारलं असता नारायण राणेंनी त्यावरही टीका केली. नारायण राणे म्हणाले, “राम हा देव आहे, तो काही भाजपाची प्रॉपर्टी नाही. रामाची आठवण भाजपाने ठेवली आणि मंदिर भाजपाने बांधलं आता जनता ठरवेल की त्याचं श्रेय कुणाला द्यायचं? उद्धव ठाकरेंना विकृतपणे काहीही बोलायची गरज नाही.”

इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत विचारलं असता ते म्हणाले, इंडिया आघाडी निवडणूक हरण्यासाठी तयार आहे का? त्यांच्याबरोबर जनता नाही. पाच राज्यांच्या निवडणुकींमध्ये काय झालं? आपण पाहिलं. उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा एकही खासदार निवडून येणार नाही असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे. आम्ही कुठलाही पैसे देऊन केलेले सर्व्हे आम्ही मानत नाही. लोकसभा निवडणुकीत विजय आमचाच होणार आहे असा विश्वासही नारायण राणेंनी व्यक्त केला.