राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा आज तिसरा दिवस आहे. अवघ्या राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे. दरम्यान, राजकीय वर्तुळातूनही विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

“निकालाची दिशा तर न्यायाच्या दिशेने असेल, कारण ज्या पद्धतीने शिवसेना पक्षाशी ४० लोकांनी गद्दारी केलेली आहे. गद्दारांना धडा तर न्यायालय शिकवेल, ही खात्री आहे. कायद्याच्या चौकटीत जर बघितलं, तरी पक्षांतर बंदी कायदा असेल, निश्चित या ४० लोकांनी मोठी चूक केली आहे याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल.” असं अंबादास दानवे एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Uddhav Thackeray On Jay Shah :
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं जय शाह यांना खुलं आव्हान; म्हणाले, “गावातील कोणत्याही तरुणाबरोबर क्रिकेट खेळून दाखवावं, मग…”
amit shah slams uddhav thackeray in karad public meeting
बाळासाहेबांनी कमावलेले सर्व उद्धव ठाकरेंनी गमावले; अमित शहा यांचा हल्लाबोल
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Raj Thackeray Slams Uddhav Thackeray in his Speech
Raj Thackeray : राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका, “बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना दिसली तर..”
Bhosari assembly, politics, ajit Gavan, Mahesh Landge
भोसरी राजकारण तापलं; महेश लांडगेंच्या तंबीला अजित गव्हाणेंचे प्रत्युत्तर, म्हणाले “पराभवाच्या छायेतून…”
rahul gandhi replied to devendra fadnavis
“लाल संविधान दाखवून शहरी नक्षलवादाला प्रोत्साहन देतात” म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Maharashtra Breaking News Live : राज्यातील सत्तासंघर्षाचा आज तिसरा दिवस; निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष

याशिवाय, “पक्षाच्या ज्या बैठकांना ही सगळी गद्दार मंडळी उपस्थित होती. या सर्वांनी पक्षनेतृत्वाला बाजूला करून, वेगळ्या पद्धतीने राज्यपालांकडे दावे केले आहेत. हे पक्षश्रेष्ठीला धरून नव्हतेच आणि नाहीत, म्हणून या सगळ्या गोष्टीच्या आधारावर निश्चितपणे येणाऱ्या काळात न्याय होईल.” असंही दानवेंनी यावेळी सांगितलं.

याचबरोबर “उद्धव ठाकरे हे काय खुर्चीला चिकटून बसणारं नेतृत्व नाही. खुर्चीसाठी काम करणारं नेतृत्व नाही, खुर्ची त्यांच्यासाठी आलेली होती. म्हणून त्यांनी जो जो त्यावेळेस त्यांच्या बुद्धीला स्मरून, आंतरिक आत्म्याने जो आवाज दिला त्यानुसार प्रतिक्रिया दिलेली आहे. कायदा जे करेल ते करेल.” असंही अंबादास दानवे यांनी यावेळी बोलून दाखवलं.