कराड : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुष्काळ पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमावर टीका करत असल्याची खंत व्यक्त करताना, या चांगल्या उपक्रमातून तब्बल दीड कोटी लाभार्थ्यांना फायदा झाला असल्याचे राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शंभूराज पुढे म्हणाले की, राज्य शासन दुष्काळाबाबत संवेदनशील आहे. आताच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे ज्यांनी अडीच वर्षे ऑनलाईन नेतृत्व केले हे उद्धव ठाकरे कधीही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत. आणि आज शेतीचा पाहणी दौरा करताना चांगले काम करणाऱ्या शासनाला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांना विविध जिल्ह्यांचे दौरे करण्याचा आग्रह आम्ही केला. त्यावेळी त्यांनी करोना महासाथ, टाळेबंदी अशी कारणे देत आमची विनंती कधीही मानली नाही. ठाकरेंना आताच्या शासनाचं काम पाहवत नसल्याने ते टीका करत सुटल्याचे दुर्दैव आहे अशीही खंत  शंभूराज यांनी व्यक्त केली.

हेही वाचा >>> “शिक्षक बिघडण्याच्या मार्गावर, मोदीजी शिक्षकांना कामाला लावणार…”; चंद्रकांत पाटील यांचे विधान

पीक कर्ज नियमीत भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय ठाकरेंच्या काळात झाला असलातरी त्यांनी हे अनुदान दिले नाही. परंतु, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आल्यानंतर शेतकऱ्यांना सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्यात आले. अतिवृष्टीत पीक नुकसानीसंदर्भात ठाकरेंनी केंद्र शासनाचे निकष पुढे केले. पण, महायुती सरकारने हे निकष बदलून मदत दिली. मंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच मराठा समाजाला इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देतील आणि याप्रश्नी सरकार संवेदनशील असल्याचा विश्वास दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray leads maharashtra state online shambhuraj desai criticism uddhav thackeray ysh
Show comments