रत्नागिरी : रत्नागिरीत तालुक्यातील शिरगाव, फणसोप आणि पोमेंडी या तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंचपद पटकावतानाच शिरगाव वगळता अन्य दोन ग्रामपंचायतींमध्ये बहुमत प्राप्त करून उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवारांनी मूळ शिवसेना शाबूत असल्याचे दाखवून दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा सरपंच असला तरी येथे शिंदे गटाने बहुमत मिळवले. पोमेंडीमध्येही ११ पैकी ५ जागा या गटाने जिंकल्या. मात्र फणसोपच्या ग्रामपंचायत निवडणुकीत केवळ एक सदस्य निवडून आल्याने शिंदे गटाला मोठा पराभव स्वीकारावा लागला.

हेही वाचा >>> “आधी खिसा कापणारे मग किराणा वाटणारे महाठग आणि…” बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर बोचरी टीका!

शिरगाव ग्रामपंचायतीच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने एकजूट दाखवल्यामुळे सरपंचपदाच्या थेट निवडणुकीत फरीदा काझी निवडून आल्या. सदस्यपदाच्या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्ग गटातून प्रभाग क्र. १ मध्ये तिरंगी लढत झाली. यामध्ये सरपंचपदी निवडून आलेल्या ठाकरे गटाच्या काझी यांनी (४२८ मते) प्रतिस्पर्धी अल्ताफ संगमेश्वरी यांच्यावर (४२६) निसटता विजय मिळवला. प्रभाग क्र. १ (सर्वसाधारण स्त्री) या प्रवर्गातून रहिमत काझी ( ४९४ मते) आणि सना अजिम चिकटे (५८० मते) विजयी झाल्या. प्रभाग क्र.२ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गातून अल्ताफ संगमेश्वरी (५७१) आणि  सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गातून (४२९) नूरीन मुकादम यांनी बाजी मारली.

प्रभाग क्र. ३ मध्ये शिंदे गटाचे उमेदवार सचिन सनगरे यांच्यासमोर महेंद्र रावणांग (उद्धव ठाकरे गट) यांनी तगडे आव्हान उभे केले होते. अटीतटीच्या लढतीत शिंदे गटाचे सचिन सनगरे यांनी २२८ मते घेऊन विजय मिळवला.

प्रभाग क्र. ४ मधील लढतही लक्षवेधी ठरली. नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या प्रभागातून मिथिला शिंदे (७३५ मते), तर सर्वसाधारण प्रवर्गातून अपक्ष उमेदवार मयूर कृष्णा सांडीम (५६४ मते) घेऊन विजयी झाले . सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गातून उद्धव ठाकरे गटाच्या अंकिता सनगरे  (५४४ मते) यांनी आणि प्रभाग क्र. ५ नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री या प्रवर्गातून नीरजा शेटय़े यांनी (७९३ मते) घेत विजय मिळवला. सर्वसाधारण प्रवर्गातून उद्धव ठाकरे गटाच्या उझेर काझी यांनी (७५८) मते घेऊन दणदणीत विजय मिळवला. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शिंदे गटाच्या खुशबी अतिब काझी यांनी (८८१ मते) घेऊन विजय मिळवला. प्रभाग क्र. ६ मध्ये शिंदे गटाने बाजी मारली.  सर्वसाधारण प्रवर्गातून शिंदे गटाचे मिलिंद बाणे (४३७), स्नेहा भरणकर (भाजप) (४०८ मते) आणि जान्हवी कदम यांनी (७४२ मते) दणदणीत विजय मिळवला आहे.

हेही वाचा >>> तेव्हा ‘हा’ समंजसपणा कुठे जातो? पुण्याच्या पावसावरून फडणवीसांना पेडणेकरांचा खोचक सवाल; म्हणाल्या, “पुण्याची सत्ता…”

दरम्यान फणसोप ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. येथे पॅनेल प्रमुख राकेश साळवी यांना रोखण्यासाठी शिंदे गटाने मोठी व्यूहरचना आखली होती. मात्र निष्ठावंत शिवसैनिकांनी संघटनात्मक ताकद दाखवून पुन्हा एकदा या ग्रामपंचायतीवर उद्धव ठाकरे गटाचा भगवा फडकवला आहे. या ग्रामपंचायतीच्या ११ जागांपैकी १० जागा उद्धव ठाकरे गटाने जिंकल्या आहेत. त्याचबरोबर सरपंचपदाच्या उमेदवार राधिका साळवी तब्बल पावणेचारशे मतांनी विजयी झाल्या. शिंदे गटाचा येथे फक्त १ उमेदवार या ग्रामपंचायतीत निवडून आला.

येथील प्रमुख लढतींमध्ये राकेश साळवी, ठाकरे गटाच्या अक्षरा साळवी आणि रितेश साळवी यांनी बाजी मारली. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून उद्धव ठाकरे गटाच्या रेणुका आग्रे व साक्षी चौगुले यांनी दणदणीत विजय मिळवला. चौगुले यांना ४३१ मते, तर आंग्रे यांना ५०४ मते मिळाली.

पोमेंडीत ग्रामपंचयातीवर उद्धव ठाकरेंचा भगवा फडकला असला तरी तेथे शिंदे गटानेही चांगली कामगिरी केली. येथील निवडणुकीत उपतालुकाप्रमुख शेखर घोसाळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. सरपंचपदाचा उमेदवार निवडून आणत पोमेंडी ग्रामपंचायत ताब्यात घेण्यात घोसाळे यांना यश आले आहे. या पदासाठी झालेल्या तिरंगी लढतीमध्ये ठाकरे गटाच्या ममता अंकुश जोशी यांनी ११३७ मते घेऊन विजयी झाल्या.

प्रभाग क्र. १ मधून सर्वसाधारण प्रवर्गातून २ उमेदवार निवडून आले. त्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचे रमेश घाणेकर (२७० मते), तर एकनाथ शिंदे गटाचे दिगंबर मयेकर यांनी (२८७ मते) घेऊन विजय मिळवला.  सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून शिंदे गटाच्या सायली बाणे विजयी झाल्या. प्रभाग क्र. २ मध्ये शिंदे गटाचा १, भाजपचा १, तर उद्धव ठाकरे गटाचा १ उमेदवार विजयी झाला आहे. सर्वसाधारण गटातून शिंदे गटाचे राजेंद्र कदम (२९६), नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री गटातून भाजपाच्या विजया कांबळे  (२४३) आणि उद्धव ठाकरे गटाच्या नलिनी कांबळे (२८९) विजयी झाल्या. प्रभाग क्र. ३ मध्ये शिंदे गटाने बाजी मारली आहे. नागरिकांचा मागासप्रवर्गमधून या गटाचे विशाल भारती (३४२) व सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातील प्रांजल खानविलकर (३७५) विजयी झाल्या आहेत. प्रभाग क्र. ४ मध्ये उद्धव ठाकरे गटाने बाजी मारली. सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून या गटाच्या रेश्मा कांबळे (३०८) व प्राजक्ता जोशी (३०५ मते) विजयी झाल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray led shiv sena won gram panchayat elections in ratnagiri taluka zws
First published on: 19-10-2022 at 03:41 IST