ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. आपल्यातील काही लोक गळ्यात पट्टा बांधून तिकडे गेले आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचा समाचार घेतला. तसेच पक्षफुटीवर भाष्य करताना ठाकरे म्हणाले, आम्ही अर्ध्या रात्री लपून-छपून तुमच्यासारख्या बैठका घेतल्या नाहीत. आम्ही दिवसाढवळ्या काँग्रेसबरोबर गेलो होतो. ठाण्यात हिंदी भाषक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्ही म्हणता मी काँग्रेसबरोबर गेलो होतो. होय, मी काँग्रेसबरोबर गेलो होतो पण खुलेआम (दिवसाढवळ्या) गेलो होतो. मी तुमच्यासारखं अर्ध्या रात्री लपून-छपून बैठका नव्हत्या घेतल्या. पण मी भाजपाला एक प्रश्न विचारू इच्छितो की, आम्हाला काँग्रेसबरोबर जाण्यास मजबूर कुणी केलं? भाजपाबरोबर आम्ही २५ वर्षे होतो. ही जगातील एकमेव युती असेल, जी इतकी वर्षे हिंदुत्वासाठी मजबूतीने एकत्र राहिली. ही युती सगळ्यात आधी कुणी तोडली असेल तर ती भाजपानेच तोडली.”

There is no bargaining power remain in eknath shinde and ajit pawar says congress leader vijay wadettiwar
“एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यात ‘बार्गेनिंग पॉवर’ नाही,” विजय वडेट्टीवार असे का म्हणाले? वाचा…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
Twitter influencer Gajabhau posted video
Gajabhau vs Mohit Kamboj: ‘गजाभाऊ अखेर समोर आला’, मोहित कंबोज यांना शॅडो गृहमंत्री म्हणत भाजपावर केली टीका
Eknath Shinde Devendra Fadnavis Ajit Pawar Narendra Modi
“…तर शिंदेंशिवाय शपथविधी झाला असता”, ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा; म्हणाले, “सत्तेत आमचेही लोक, आतल्या गोष्टी…”
Chhagan Bhujbal On Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदेंच्या नाराजीवर छगन भुजबळांची महत्त्वाची प्रतिक्रिया; म्हणाले, “मुख्यमंत्रीपद गेलं आणि…”
maharashtra government formation eknath shinde will be part of government led by devendra fadnavis
आज केवळ तिघांचाच शपथविधी? एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी; महसूल आणि नगरविकास खाती? मंत्र्यांच्या नावांवर खल
Shivsena UBT Leader Vinayak Raut Criticized Ekanth Shinde
Vinayak Raut : “महायुतीत एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे, गरज असेल तर..”; ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याची टीका

हेही वाचा- “…तर हा देश नालायक लोकांच्या हातात जाईल”, उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

“आता आपल्यातील काही लोक गळ्यात पट्टा बांधून तिकडे गेले आहेत. तसा पट्टा माझ्या गळ्यात बांधणारा अजून कुणी पैदा (जन्मला) झाला नाही आणि तो होणारही नाही. कारण माझ्या नसांमध्ये बाळासाहेब ठाकरेंचं रक्त वाहत आहे. मी कधीही लाचार किंवा गुलाम बनणार नाही. मी तुमच्यासारख्या माझ्या हिंदू लोकांसमोर नक्की झुकेल. पण मी हुकूमशाहीपुढे कधीही झुकणार नाही. मी हुकूमशाही कधीही मान्य करणार नाही,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Story img Loader