अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांनी अलीकडेच शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राज्यात विविध ठिकाणचे दौरे करत आहेत. सध्या उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज (रविवार, ०९ जुलै) वाशीम येथील जाहीर सभेतून उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसह भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “राजकारण म्हटलं की फोडाफोडी होतेच, हे आपल्याला माहीत आहे. छगन भुजबळ आधी आपल्या पक्षात होते मग राष्ट्रवादीत गेले, आता तिकडे गेले. ही फोडाफोडी होतच असते. पण पक्ष संपवून टाकायची जी वृत्ती आली आहे, ती आपल्याला संपवून टाकायला हवी. राजकारणात विरोधकांनी जाहीर सभेतून आमच्यावर बोलावं, आम्ही तुमच्यावर बोलतो. मग जनता जे ठरवेल ते मान्य करायचं, याला लोकशाही म्हणतात. मात्र, आता तुम्ही मत कोणालाही द्या सरकार माझेच येणार, असं चाललं आहे. पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं, आता खोक्यातून सरकार जन्माला यायला आहे.”

अरविंद केजरीवाल आणि 'आप'ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं? (फोटो सौजन्य पीटीआय)
अरविंद केजरीवाल आणि ‘आप’ला रोखण्यासाठी भाजपाची मतदारांना कोणती आश्वासनं?
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
BJP started journey to become superpower with record target of registering 1.5 crore workers
भाजप ‘समृद्धी’ महामार्गाने ‘शत प्रतिशत’कडे
Party-wide campaign against Jayant Patil allegation by state spokesperson Praveen Kunte-Patil
जयंत पाटील विरुद्ध राजकीय विरोधकांकडून मोहीम
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Sanjay Raut Answer to Amit Shah
Sanjay Raut : संजय राऊत यांचं अमित शाह यांना उत्तर, “उद्धव ठाकरेंना दगाबाज म्हणणं हा बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आणि…”
Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”

हेही वाचा- हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या कुलकरांच्या WhatsApp चॅटमधून धक्कादायक खुलासे; राफेल विमानांपासून क्षेपणास्त्रांवर चर्चा!

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, “जर माझा कारभार वाईट असेल तर जनता मला घरी बसवेल. पण तुम्ही जे काही केलं, मला म्हणजे शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राला तुम्ही खुर्चीवरून खाली उतरवलं. याची मला पर्वा नाही. मला त्या खुर्चीचा कधीच मोह नव्हता. माझ्या माता-भनिगी मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात. यापेक्षा दुसरं सुख मला काही नाही.”

हेही वाचा- “…तेव्हा अमित शाहांनी दिलेला शब्द पाळला नाही”, बंद दाराआड झालेल्या चर्चेवर उद्धव ठाकरेंचा खुलासा

“आपल्याकडील ४० आमदार भाजपाकडे गेले आहेत. अपक्षांचाही त्यात समावेश आहे. १६० की १६५ जणांचं मजबूत सरकार आहे. तरी, पुन्हा राष्ट्रवादी चोरण्याची काय गरज होती? शिवसेना आणि भाजपाला अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्याचं, हे माझं आणि अमित शाहांचं ठरलं होतं. मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं. पण मला शिवसेनेचा मुख्यमंत्री तेव्हाही करायचा होता आणि आताही करायचा आहे. पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच,” असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

Story img Loader