Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख विलासी राजा असा करण्यात आला आहे. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी उद्धव ठाकरेंना अतिवालासी म्हटलं आहे.

सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय?

दिल्ली विधानसभेची निवडणूक भाजपा आणि आप यांच्यासाठी जीवन-मरणाचा खेळ झाला आहे. या खेळात काँग्रेस पक्षही स्वतःचे हुनर दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. अरविंद केजरीवाल एकाच वेळी काँग्रेस आणि भाजपाच्या निशण्यावर आहेत. केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून काहीच केलं नाही. दिल्लीच्या जनतेला सुविधा पुरवण्यात ते अपयशी ठरले. मात्र स्वत)साठी त्यांनी सरकारी खजिना रिकामा करुन शीशमहल बांधला. त्याची किंमत ४५ कोटी आहे. शीशमहलच्या खर्चाचा हा लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह प्रत्येक प्रचारसभेत मांडत आहेत. केजरीवाल यांचा शासकीय बंगला आणि उधळपट्टी दिल्ली विधानसभा निवडणुकीत टीकेचा विषय ठरु शकतो, पण दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या घरांवर गेल्या दहा वर्षात कशी आणि किती उधळपट्टी झाली? मंत्र्यांची घरे राजेशाही, मोगालाई पद्धतीने सजवली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी स्वतंत्र महल बनवण्याचे कार्य सुरु आहे. त्यावर जनतेच्या तिजोरीतून सुमारे ४०० कोटी उधळले जाणार, सॉरी खर्च केले जाणार. मोदी यांनी जगभ्रमणासाठी १५ हजार कोटींचे विमान खरेदी केले. याआधीचे पंतप्रधान एअर इंडियाच्या विमानाने प्रवास करत पण मोदींचा तोराच वेगळा. मोदी १०-१५ लाखांचा सूट घालतात, त्या सूटवर तितक्याच किंमतीचे पेन खोचतात. एखादा झोलाछाप फकीर ही उधळपट्टी स्वतःच्या झोल्यातून कशी करु शकेल? भारत देश गरीब आहे पण गरीब देशाचा राजा विलासी आहे. पण बोलायचं कुणी? बोलेंगे तो कटेंगे.

What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : सुरेश धस यांचा आरोप; “संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोपी बिक्कडने पळवले, वाल्मिक कराड आणि…”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
government land sale controversy report against female tehsildar news in marathi
बापरे..! महिला तहसीलदाराकडून चक्क शासकीय भूखंडांची विक्री; निलंबन केल्याखेरीज चौकशी अशक्यः एसडीओ डव्हळे
Suresh Dhas Statement About Pankaja Munde and Dhananjay Munde
Suresh Dhas : “लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळेच झाला, कारण..”; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट
What sharad pawar wrote on that paper chhagan bhujbal says
Chhagan Bhujbal: शरद पवारांनी त्या कागदावर काय लिहून दिलं होतं? छगन भुजबळांनी सांगितला पवारांचा ‘तो’ संदेश; म्हणाले…
highest paid man in the world
तासाला दोन कोटी, तर वर्षाला १७ हजार कोटी; जगात सर्वाधिक पगार घेणारे जगदीप सिंग कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

माननीय पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं आयुष्य हे छोट्याश्या चहाच्या दुकानातून सुरु केलं. अत्यंत हाल सहन करुन आणि संघर्ष करुन त्यांनी पंतप्रधान पद गाठलं आहे. मोदींच्या आयुष्याच्या अभ्यास केला तर मोदींची उद्धव ठाकरे टाचणी इतकीही बरोबरी करु शकत नाहीत. उद्धव ठाकरेंना हे समजलं पाहिजे की मोदींनी त्यांचं आयुष्य १४० कोटी भारतीयांना समर्पित केलं आाहे. अशा व्यक्तीवर उद्धव ठाकरेंनी बोलणं योग्य नाही. उलट सामनात हे छापून यायला हवं होतं की मातोश्री २ मध्ये राहणारे अतिविलासी उद्धव ठाकरे. कसा अतिविलास करतात. अडीच वर्षे म्हणून कसा अतिविलास केला? मंत्रालयात दोन दिवसही आले नाहीत. स्वतःला काचेच्या महालात राहून कसा अतिविलास केला ते सांगा असा टोला चंद्रशेखर बावनकुळेंनी लगावला आहे.

हे पण वाचा- Maharashtra Politics : उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करत आहेत?

संजय गायकवाड यांच्याबाबत काय म्हणाले बावनकुळे?

आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी हे जनसेवक आहेत. जनसेवकांनी जनतेच्या आणि मतदारांच्या समोर नतमस्तक होऊनच कारभार केला पाहिजे. त्यामुळे संजय गायकवाड यांनी काय भूमिका मांडली त्याबाबत मला काही बोलायचं नाही. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे जनतेचे आभार मानून आम्ही या पदांवर बसलो आहोत. आम्ही राजे नाहीत तर आम्ही जनसेवक आहोत असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं आहे. तसंच संजय गायकवाड यांनी जे वक्तव्य केलं


Story img Loader