Uddhav Thackeray छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवण्यात आला होता. डिसेंबर २०२३ या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. यावरुन आता उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं आहे. आज उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) गणेश उत्सव समन्वय समित्यांशी संवाद साधला. रंगशारदा या ठिकाणी एक भाषण केलं. त्यावेळी त्यांनी ही जोरदार टीका केली आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, त्यानंतर सरकार म्हणतं आहे नौदलाची जबाबदारी आहे. नौदल म्हणतं आहे की आमची नाही PWD ची जबाबदारी आहे. मालवणमध्ये आदित्य वगैरे सगळे गेले होते. ते काही राडा करायला गेले नव्हते. आमच्या छत्रपती शिवरायांचा पुतळा आठ महिन्यात पडतोच कसा? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) विचारला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
हे पण वाचा- छत्रपती शिवाजी महाराजांचा नवा पुतळा मालवणमध्ये दाखल, पोलीस करत आहेत चौकशी
दादा कोंडकेंचं उदाहारण देत टोलेबाजी!
“पूर्वी एक दादा कोंडकेंचा सिनेमा होता, ‘बोट लावेन तिथे गुदगुल्या’ नाव घेतलं तरीही आपल्याला हसायला येतं. आता मोदींचा सिनेमा येतोय हात लावेन तिथे सत्यानाश. आपण क्रिकेटचा सामना हरला त्याचं कारणही मोदीच आहेत. हात लावेन तिथे सत्यानाश ही यांची गॅरंटी आहे. ये मेरी गॅरंटी आहे असं वर पुन्हा सांगतात. असल्या सडक्या गॅरंटी आपल्याला नको. एक कविता आहे बघा सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो. आपल्या राष्ट्रपतींचं नावही योगायोगाने द्रौपदी आहे. आम्हाला आता तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत. पंतप्रधान महाराष्ट्रात येत आहेत, ज्यांना मणिपूरबद्दल बोलायला काळ गेला. आता ते बदलापूरबद्दल बोलतील की बंगालबद्दल ते बघावं लागेल.” असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.
भगिनींच्या मदतीला विघ्नहर्त्यासारखे धावून जा, उद्धव ठाकरेंचं आवाहन
गणपती हे आपलं प्रतीक आहे, तो विघ्नहर्ता आहे. तुमच्या रुपातून माझ्या भगिनीसाठी विघ्नहर्ता मदतीला धावून गेला पाहिजे. निधी मिळतो म्हणून तुमचा आत्मा विकू नका. गणपती बाप्पा पावतो म्हटलं की मला काहीजण म्हणतात तुम्ही अंधश्रद्धा पाळता. पण मला वाटतं की गणपती पावतो. रक्तदान शिबीराच्या माध्यमातून आपला बाप्पा पावतो. मी श्रद्धा आणि अंधश्रद्धेत गफलत करत नाही. मी अंधश्रद्धाळू नाही. गणपती मंडळांनी चांगली कार्ये करत राहिली पाहिजे. तुम्ही सगळे गणपतीचे दूत आहेत हे मी म्हटलं तर काय चूक आहे. असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.