Uddhav Thackeray On Chhgan Bhujbal Latest Political News : महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीमधील अनेक दिग्ग्ज नेत्यांना मंत्रि‍पदापासून दूर ठेवण्यात आले आहे. या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचादेखील समावेश आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. तसेच ते नवीन राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भुजबळांच्या नाराजीवर प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

छगन भुजबळ नाराज आहेत आणि राजकीय भूमिका घेत तुमच्याकडे परत आले तर तुम्ही स्वागत कराल का? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ते काही बोलले तर मी त्यावर उत्तर देईन, आपण कशाला त्यावर काही बोलावं. भुजबळांबद्दल मला फार वाईट वाटलं. असं अनेक जणांबद्दल मला आतून वाईट वाटतंय. एका अपेक्षेने तिकडे गेले होते. बरं काही जणांना बरं घट्ट झालेली जाकेट आतातरी घालयला मिळालं. अशी बऱ्याचं जणांची जॅकेटं वाट बघत असतील अशा सर्वांबद्दल मी सहानुभूती व्यक्त करतो”, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Chhagan Bhujbal Angry on Mahayuti
“…तेव्हा यांनी कच खाल्ली”, भुजबळांचा राष्ट्रवादीपाठोपाठ महायुतीला टोला; लोकसभेतली खदखद अखेर बाहेर पडली
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Vishal Patil Sansad tv (1)
“पैसा झाला खोटा”, विशाल पाटलांनी महाराष्ट्रातील ‘लाडक्या बहिणीं’ची व्यथा थेट संसदेत मांडली
Chhagan Bhujbal
“मी तुमच्या हातातलं खेळणं आहे का?” भुजबळांचा प्रफुल्ल पटेलांवर संताप; राष्ट्रवादीत जुंपली
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Nawab Malik big claims about maharashtra Election
Nawab Malik: शरद पवार आणि एकनाथ शिंदे संपर्कात?, ‘निवडणुकीनंतर काहीही होऊ शकतं’, नवाब मलिक यांचा दावा
Chandrashekhar Bawankule (5)
भुजबळ-मुनगंटीवारांच्या नाराजीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “हे दोन्ही नेते…”
Former CM Devendra Fadnavis of the BJP and Sena leader Sanjay Raut Meet
Meeting of Devendra Fadnavis and Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्या ‘फोटो ऑफ द डे’ ची इनसाईड स्टोरी काय?

मंत्रिमडळात महायुतीतील अनेक दिग्गज नेत्यांना स्थान मिळालं नाही, या पार्श्वभूमीवर लाडका आमदार किंवा लाडकी माणसं अशी काही सरकारची योजना आहे का? असा खोचक सवाल देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ यांनी “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना” असं सूचक विधान केलं होतं. याबद्दल उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला, यावर हसून उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “या सरकारची झालीय दैना त्यामुळे तिकडे चैना, मैना असं काही होणार नाहीये, वहाँ नहीं रहना हे त्यांचं योग्य आहे.

हेही वाचा>> सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना राजकीय आश्रय मिळतोय का? धनंजय मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारातराष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे आणि महाराष्ट्रातील ओबीसींचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना स्थान दिलेलं नाही. यानंतर छगन भुजबळ यांच्यासह समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. नाराज छगन भुजबळांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं की तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? पक्षाने डावलल्यानंतर तुमची आता पुढची भूमिका काय असेल? यावर भुजबळ म्हणाले, “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”.

Story img Loader