ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ‘वज्रमूठ’ सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकास्र सोडलं. सत्तेसाठी मी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो, तर तुम्ही आता मिंध्यांचे काय चाटत आहात? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना विचारला आहे.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, “आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करतो? बरं ठीक आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही अधिक घट्ट आहोत.”

Uddhav Thackeray On Amit Shah
Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Uddhav Thackeray on Pankaja Munde
Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’
raj thackeray latest news
काँग्रेसबरोबर युती करण्यावरून राज ठाकरेंची पुन्हा उद्धव ठाकरेंवर सडकून टीका; म्हणाले, “मी, माझा स्वार्थ, माझी खुर्ची अन्…”
raj thackeray criticized sharad pawar
“शरद पवारांचं आयुष्य भूमिका बदलण्यात गेलं”, राज ठाकरेंची सडकून टीका; रिफायनरीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनाही केलं लक्ष्य, म्हणाले…
raj thackeray criticized uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंच्या हातून पैसा सुटत नाही, बॅगेत काय असणार?” राज ठाकरेंची खोचक टीका!
sushma andhare on uddhav thackeray bag checking
उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्याच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्या; म्हणाल्या, “जर तुम्ही…”

हेही वाचा- “पोलिसांना मस्ती आली असेल, तर…”; संभाजीनगरमधील सभेतून अंबादास दानवेंची थेट धमकी, नेमकं काय घडलं?

“मध्यंतरी अमित शाह पुण्यात येऊन गेले. त्यांनी माझ्यावर आरोप केले. मी सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले, असं ते म्हणाले. मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही, असं नाहीये. पण मला आवरावं लागतं. काही शब्द, भाषा त्यांनाच (बाळासाहेब ठाकरे) शोभणारी आहे. मला ती भाषा शोभणारी नाही. पण मी त्यांना (अमित शाह) फक्त एवढंच म्हणालो की, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो. तर तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटत आहात?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

हेही वाचा- “…तर आमदारकी कधी जाईल सांगता येत नाही”, संभाजीनगरमध्ये धनंजय मुंडेंचं विधान

“बिहारमध्ये आधी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं. आता तेच सरकार पुन्हा स्थापन झालंय. चांगली चाललेली सरकारं फोडायची, हा किती भयानक प्रकार आहे. पण त्यावेळी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार पाडून तुम्ही नितीशकुमार यांचं काय चाटत होतात? हा माझा सवाल आहे. आता तुम्ही संगमांसोबत सत्तेत आहात. पण त्याच संगमांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मग संगमांनी हिसका दाखवल्यानंतर आता तुम्ही संगमांचं काय चाटत आहात?” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.