आपल्याकडं गुरु विसरणारी लोकं तयार झाली आहेत. गुरु आणि वडील चोरणारी लोकंही आहेत. चोरी करुद्या, पण संस्कार कधी चोरु नयेत. संस्कार हे जन्मजात असावे लागतात, असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे. मीरा-भाईंदर येथील जैन मंदिराला भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे बोलत होते.

“बाळासाहेब ठाकरेंचं भरपूर चाहते होते. त्यांना चाहत्यांची आवश्यकता कधीही पडली नाही. कोठेही गेलं, तरी चाहतेच चाहचे असायचे. देशात बाळासाहेबांची तेव्हापासून सुरु झालेली हवा आजही काय कायम आहे,” असं सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, “कठीण काळात कोण बरोबर येतो, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण, पुजा असली की, सर्वजण तीर्थप्रसादाला येतात. पण, संकटसमयी कारणे सांगून दूर पळतात.”

Aditya Thackeray Dapoli, Aditya Thackeray talk on Hindutva, Uddhav Thackeray,
उद्धव ठाकरे हे घरी एकच असतात व बाहेर देखील एकच असतात – आदित्य ठाकरे
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Uddhav Thackeray criticized Eknath Shinde
“माझी बॅग तुझ्याकडे देतो, फक्त त्यातले कपडे…”; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं!
Uddhav Thackeray Speech in Ausa Latur
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
Uddhav Thackeray News Update News
“महाराष्ट्र दरोडेखोर अन् गुंडांच्या हाती”, उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर सडकून टीका; पक्षचिन्हावरून माजी सरन्यायाधीशांनाही केलं लक्ष्य; म्हणाले…
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

हेही वाचा : “सुधीर तांबे दोन वेळा आमदार, गटनेते होते तरीही…”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

“मी कधीच संकटाला संकट मानत नाही. संकटात संधी शोधण्याचं काम करतो. जो मर्द असतो, त्याला लढाई लढण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे विरोधक जेवढा ताकदवान असेन तेवढी लढाई लढण्यास हिंमत येते. अन् ही लढाई आम्ही जिंकणारच,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.

“२५ वर्षे आमचे मित्र राहिलेले, आज ज्या रस्त्याने जात आहेत, तो मार्ग आमचा नाही. जे स्वप्न आम्ही पाहिलं होतं, ते आता तोडून-मोडून टाकलं जात आहे. ते स्वप्न आणि हिंदुत्व आमचं नव्हतं. धर्मावरून लोकांची दिशाभूल करायची आणि आपल्या ताब्यात ठेवयाचं, हे राजकारण सुरु आहे,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

हेही वाचा : राज्यात ‘एवढ्या’ ठिकाणी सुरु होणार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

“महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी आहे, मग देशात का लागू करत नाही. महाराष्ट्रात माता म्हणायचं आणि बाजूच्या राज्यात जाऊन खाता, हे कोणतं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे आपण माणूस म्हणून जन्म घेतला असून, धर्म नंतर आपल्याला चिकटला आहे. त्याच धर्माचा घेऊन देशावर कब्जा करायचा आणि सर्वांना गुलाम करायचं सुरु आहे. आताच आपण डोळे उघडले नाहीतर; परत मिटलेले डोळे कधीच उघडता येणार नाही. त्यामुळे आतातरी सर्वांनी जागं व्हावं,” असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.