Uddhav Thackeray On Amit Thackeray : राज्यात विधानसभेच्या निवडणुकीचा धमाका सध्या सुरु आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबरच्या दिवसाकडे अनेकांचे लक्ष लागलेलं आहे. खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी होणार आहे. सध्या राज्यभरात विविध मतदारसंघात दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभा सुरु आहेत. या सभांच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचंही पाहायला मिळत आहे. मात्र, या निवडणुकीत मुंबईतील माहिम मतदारसंघ चांगलाच चर्चेत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणूक लढवत आहेत.

खरं तर माहिम मतदारसंघात तिंरगी लढत आहे. यामध्ये मनसेचे अमित ठाकरे, शिवसेना (ठाकरे) महेश सावंत आणि शिवसेनेचे (शिंदे) ३) सदा सरवणकर अशी लढत होत आहे. या मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी देखील घडल्या. सदा सरवणकर हे उमेदवारी मागे घेण्यार असल्याची चर्चा होती. मात्र, शेवटपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. सदा सरवणकर यांनी उमदेवारी कायम ठेवली. निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याच्या शेवट्या दिवशी सरवणकर यांचा मुलगा राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थ दाखल झाले होते. मात्र, यानंतरही त्यांनी उमदेवारी कायम ठेवली.

Raj Thackeray Uddhav Thackeray (1)
Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा
sada sarvankar marathi news
अमित ठाकरेंचा मार्ग मोकळा? सदा सरवणकरांचे माघारीचे संकेत? म्हणाले, “कार्यकर्त्यांशी बोलून पुढचा निर्णय…”
Uddhav Thackeray campaign aggressively against 40 rebel MLAs and hold meetings in Bhiwandi Rural
फुटीर आमदारांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांची आक्रमक रणनीती, भिवंडी ग्रामीणमध्ये जिल्ह्यातील पहिली सभा

हेही वाचा : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

या सर्व घडामोडी घडल्यानंतर आता विविध मतदारसंघात नेत्यांच्या सभा सुरु आहेत. यातच आज राज ठाकरे यांची वरळीत सभा पार पडली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे हे माहिम मतदारसंघात सभा घेणार का? याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. आता यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी यावर भाष्य करत माहिममध्ये सभा घेणार नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“मला आवश्यकता नाही. माहिम हा माझा आहे. माहिम हा मतदारसंघ शिवसेनेचा (ठाकरे) आहे. आपण तसं पाहिलं तर मुंबईत काल महाविकास आघाडीची एक सभा झाली. यानंतर आता मुंबईच्या बाहेरच माझ्या सभा आहेत. मुंबईकरांवर माझा आणि माझ्यावर मुंबईकरांचा विश्वास आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.