Uddhav Thackeray on Ram Mandir Pranpratistha : लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या मंदिराचे निर्माण अद्यापही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे निर्माणाधीन मंदिरात प्राणप्रतिष्ठा करू नका, अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती. परंतु, विरोधकांच्या मागणी आणि टीकेकडे दुर्लक्ष करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा केला. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. ते उमरगा येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रवीण स्वामी यांच्या प्रचारार्थ बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला देशभरातील अनेक मान्यवरांना आमंत्रण देण्यात आलं होतं. राज्यातील अनेक नेत्यांनाही आमंत्रण होतं. परंतु, राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी हे आमंत्रण नाकारून सोहळ्यात गैरहजर राहिले. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांवर टीकाही केली आहे. या टीकेची नक्कल करत उद्धव ठाकरे म्हणाले, ” नरेंद्र मोदी म्हणतात की, अरे भाई और बेहनो मैं पुछना चाहता हूँ की उद्धव ठाकरे राम मंदिर क्यू नहीं गए. अरे भाई वो गळ रहा है ना. वो गळनेका थांबेगा तो मैं जाएगा. कारण तुम्ही घाई घाई में उसका उद्घाटन केल्या”, असं हिंदी मराठी भाषेचा मिलाप करत उद्धव ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी केली. त्यांच्या या टिप्पणीनंतर सभामंडपी एकच हशा पिकला.

हेही वाचा >> Uddhav Thackeray : “तुमचं नियुक्ती पत्रक दाखवा, पाकिटातील पैसे दाखवा”, सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच उद्धव ठाकरेंनी घेतलं फैलावर!

ते ढोंग करत होते तेव्हा मी…

ते पुढे म्हणाले, ” प्राणप्रतिष्ठेवेळी आजूबाजूला एकही शंकाराचार्य नाही. सगळे भष्ट्राचारी बसले होते. ते सगळे भ्रष्टाचार्य. गळत्या राम मंदिरात जाऊ नका हे शं‍कराचार्यांनीही सांगितलंय. मी मुख्यमंत्री होण्याआधी राम मंदिरात गेलो होतो आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना तिथे घेऊन गेलो होतो. आणि तुम्ही तिथे ढोंग करत होतात, तेव्हा मी नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो होतो. त्याच काळाराम मंदिरात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला होता.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray on ram mandir pranpratistha in umaraga prachar sabha sgk