Uddhav Thackeray News : मुंबई काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राजीव गांधी सद्भावना दिवस कार्यक्रमात एक असं चित्र पाहण्यास मिळालं जे महाराष्ट्र विसणार नाही. या कार्यक्रमात महाविकास आघाडीचे दोन घटक पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनाही बोलवण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं पाहण्यास मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नेमकं काय घडलं?

काँग्रेसच्या आजच्या सद्भावना दिवस कार्यक्रमात उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) आणि संजय राऊत यांनी उपस्थिती लावली. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेस पक्षाचे उपरणं घातलं. काही वेळ ते उपरणं उद्धव ठाकरेंनी तसंच ठेवलं. तसंच हसत हसत त्यांनी नाना पटोले आणि मल्लिकार्जुन खरगेंशी गप्पाही मारल्या. पण नंतर शरद पवारही त्या कार्यक्रमात आले. सुरूवातीला शरद पवारांनी काँग्रेसचे उपरणे घालण्यास नकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनीही त्यांच्या गळ्यातील उपरणं काढलं आणि बाजूला ठेवलं.

उद्धव ठाकरेंच्या गळ्यात काँग्रेसचं उपरणं, राजीव गांधी सद्भवाना सभेतली दृश्यं चर्चेत

त्यावेळी काँग्रेसचे आमदार भाई जगतापांनी ते उपरणं गळ्यातच ठेवावं असा आग्रह उद्धव ठाकरेंना ( Uddhav Thackeray ) केला. मात्र उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी हसत हसत त्याला नकार दिला. मात्र संजय राऊतांनी त्यांच्या गळ्यातील उपरणं कायम ठेवलं. काही वेळाने शरद पवारांनीही काँग्रेस पक्षाचं उपरणं गळ्यात घातलं. ही सगळी दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत.

हे पण वाचा- Eknath Shinde : “उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं हे मला सांगितलं असतं तर…”, एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं वक्तव्य

उद्धव ठाकरे भाषणासाठी उभे राहिले तेव्हा काय म्हणाले?

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) ज्यावेळी भाषणासाठी उभे राहिले त्यावेळी त्यांनी यावर काँग्रेसच्या उपरण्यावर भाष्य केलं. भाषणाची सुरुवात त्यांनी, “काँग्रेसचे असलात तरीही जमलेल्या माझ्या बंधूनो, भगिनींनो आणि मातांनो” अशी केली. तसंच म्हणाले, “मी आज खरंच काँग्रेसच्या कार्यक्रमाला आलो आहे हे बघायला स्वतःला चिमटा काढून पाहिला. काँग्रेसच्या कार्यक्रमाला असल्याने मी गळ्यात गमछा घातला. तुमचा आदर ठेवला, मान ठेवला. पण उद्या याचा नक्की फोटो येणार. तो फोटो यावा यासाठीच मी काँग्रेसचे गमछा गळ्यात घातला होता. मी इकडे तिकडे काय करतो त्यांच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं. कारण समोरच्यांचं काही कर्तृत्व नाही. दाखवा काय दाखवायचं ते.” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी हे सगळं स्पष्टीकरण दिलं असलं तरीही त्यांच्या गळ्यात काही वेळ का होईना काँग्रेसचा गमछा होता. त्याबाबत आता विरोधक त्यांच्यावर टीका करण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.