Uddhav Thackeray Pune Speech : छत्रपती शिवरायांची म्हणून शासनाने लंडनहून आणलेली वाघनखे खरी नाहीत तर नकली आहेत, असा इतिहास संशोधकांचा दावा आहे. यावरून विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. आता खुद्द उद्धव ठाकरेंनीच या प्रकरणावरून सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चिमटा काढला आहे. आज पुण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात ते बोलत होते.

“मला महाराष्ट्राती काना कोपरा स्वाभिमानाने पेटलेला दिसला पाहिजे. मला संपूर्ण महाराष्ट्रातील दऱ्या खोऱ्यांमध्ये या व्यापारी हुकुमशाहांविरोधात राण किंवा वनवा पेटवलेला पाहिजे. हा वनवा पेटवण्याची ताकद तुमच्यात आहे. कारण तुमच्या हातात तलवार आहे”, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

annapoorna issue srinivasan reaction
“झालं ते विसरून पुढं जायला हवं”, ‘त्या’ व्हिडीओवरील वादावर अन्नपूर्णा हॉटेलचे संचालक श्रीनिवासन यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ज्यांनी…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Two bullets entered Vanraj Andekar body according to the postmortem report
वनराज आंदेकरांच्या शरीरात दोन गोळ्या शिरल्या; आरोपींकडून  तब्बल २४ वार, शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर 
Vanraj Andekar Shot Dead in Pune News| Pune Crime News Vanraj Andeka Attack
Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून
Congress is involve in dispute between two factions of BJP Nagpur news
भाजपच्या दोन गटातील वादात काँग्रेसची उडी, काय आहे प्रकार
PM Thailand, Paetongtarn Shinawatra,
विश्लेषण : थायलंडच्या पंतप्रधानपदी ३७ वर्षीय युवा महिला… कोण आहेत पेतोंगतार्न शिनावात्रा? त्यांच्यासमोर कोणती आव्हाने?
Former mayor of Badlapur Vaman Mhatre expressed his anger on a female reporter who covered the Badlapur rape incident
Badlapur School Case : वामन म्हात्रे यांची आधी वादग्रस्त टिप्पणी, नंतर सारवासारव
father-in-law, extraordinary personality,
माझे सासरे : एक असाधारण व्यक्तिमत्त्व

हेही वाचा >> Uddhav Thackeray: ‘मी ढेकणाला आव्हान देत नाही’, उद्धव ठाकरेंची पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर टीका; म्हणाले…

“मुनगंटवारांनी नाघनखे आणली आहेत. पण अहो मुनगंटीवार, नखाच्या मागे वाघ असतो ना तेव्हा त्या वाघनखांना अर्थ असतो. त्या वाघनखांनी अफजल खानाचा कोथळा काढलेला आहे की नाही हा विषय वेगळा आहे. पण त्या नखाच्या मागे शिवाजी राजा म्हणून वाघ होता. म्हणून त्या नखाला महत्त्व आहे. त्या नखाच्या मागे मुनगंटीवार असतील तर वाघनखे आणि मुनटंगीवार कुठेतरी जुळतंय का? असा बोचरा सवालही त्यांनी (Uddhav Thackeray) उपस्थित केला.

आता शाखांवरील बोर्डावर धनुष्यबाण नको, मशाल लावा

“तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला नखं लावत आहात. त्यामुळे ही वाघनखे कशी असतात हे माझ्यासमोर बसलेली आहेत. ही महाराजांची वाघनखं आहेत. खरी वाघनखे म्हणजे महाराजांची जनता आहे. शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रातील जनता आहे. ही वाघनखे घेऊन जो अब्दाली आपल्यावर चालून आलेला आहे. होय मी अमित शाहांना अब्दाली म्हणणार. कारण मला तुम्ही नकली संतान म्हणता तेव्हा लाज नाही वाटत. मग तुम्ही अद्बाली असाल तर मी कशाला घाबरू? महाराष्ट्राचा स्वाभिमान पायदळी तुडवणारा औरंगजेब पाहिजे की शिवसैनिक पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे. मशाल केवळ बोर्डवर नको तर हृदयात धकधकती पाहिजे. शिवसेनचा वाघ मुनगंटीवारांकडे नाहीय, तुम्ही नखं घेऊन बसा, कारण माझ्याकडे वाघ आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उपस्थितांमध्ये स्फुल्लिंग चढवलं.