अहमदनगर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले असताना त्यांच्या गाडी समोर सूपार्या टाकून आंदोलन करण्यात आले. यावर राज ठाकरे यांनी माझ्या नादी लागू नका असा इशारा दिला होता. यानंतर अवघ्या काही तासांतच मनसैनिकांनी ठाणे येथे उद्धव ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या आधी त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर नारळ फेक करून आंदोलन केले. यानंतर याचे पडसाद कोल्हापूरमध्ये उमटले. मनसेचे बॅनर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी फाडले.
हेही वाचा : Sanjay Raut : मविआचं ठरलं? उद्धव ठाकरेच मविआचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार? संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले…
याचे लोन आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये पोहोचले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे बेन रोडवर मोठ्या प्रमाणामध्ये सुपारी बाज असे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा संघर्ष आता नगर जिल्ह्यामध्ये पोहोचला आहे. या मोठ्या फ्लेक्सवर ‘लवकरच घेऊन येत आहेत, पुढील अपडेट १६ ऑगस्ट या दिवशी’ असे लिहिले असून सुपारी व खाटाचे चित्र काढण्यात आले आहे. ह्या बॅनरची कर्जत मध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे बॅनर कोणी लावले याबाबत नगरपंचायतचे मुख्याधिकारी किंवा कार्यालयामध्ये विचारणा केली असता त्यांनी याबाबत आम्हाला काहीही माहिती नाही, असे सांगितले. सुपारी बाज या बॅनर वरून जोरदार चर्चा मात्र सुरू आहे.