खालापूरमधील इरर्शाळगडाच्या पायथ्याशी वसलेल्या इर्शाळवाडी येथे बुधवारी दरड कोसळली. या दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, १०५ जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे. अशातच आज ( २२ जुलै ) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथील ग्रामस्थांशी संवाद साधत धीर दिला. पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “बोलण्यासाठी माझ्याकडे काही शब्द नाहीत. ही दुर्दैवी दुर्घटना घडल्यानंतर मी फक्त तोंड दाखवण्यासाठी आलो नाही. तर, भविष्यात तुमचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्याबरोबर आहोत.”

maharashtra poll 2024 ubt chief uddhav thackeray finally managed to convince sudhir salvi
शिवडीतील सुधीर साळवींची समजूत; उद्धव ठाकरेंशी चर्चा, अजय चौधरींना सहकार्य करण्याचे आश्वासन
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, dharashiv district, paranda assembly constituency,
परंड्यात आघाडीत बिघाडी? ठाकरेंची सेना-मोठ्या पवारांची राष्ट्रवादी आमनेसामने
Aditya Thackeray power show , Aditya Thackeray latest news, Aditya Thackeray marathi news,
वरळीमध्ये आदित्य ठाकरेंचे शक्तिप्रदर्शन, शिवसेनेच्या नेत्यांसह हजारो शिवसैनिकांची गर्दी
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
Bala Nandgaonkar
मनसे उमेदवाराविरोधात ठाकरे गटाची मोहीम, ´आपली शिवडी आपला बाळा´ला, ´दहा वर्षे कुठे होता बाळा´चे प्रत्युत्तर
ajit pawar
राजापुरात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; अजित यशवंतराव शिवसेना ठाकरे गटात दाखल
Chandrasekhar Bawankule critisize Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे यांची स्थिती शोले चित्रपटातील जेलरसारखी…

“आसपासच्या वस्त्या आणि तुमचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी करू की पुन्हा अशा संकटाशी सामना करण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्रातील बऱ्याच वस्त्या दरडग्रस्त कधीही होऊ शकतात. पण, म्हणून आपण जबाबदारी टाळू शकत नाही. ही घटना घडण्यापूर्वी येथील पुनर्वसन झालं पाहिजे होते. पण, दुर्दैवाने ही घटना घडली आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

“अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तरुण आणि महिलांना नोकरीची व्यवस्था करावी. फक्त घर बांधून पुनर्वसन होणार नाही. यात राजकारण कुठेही आणणार नाही. राजकारणाच्या पलीकडे माणुसकी हा भाग असतो. पुनर्वसन होईपर्यंत ज्या गोष्टींची मदत लागेल, ती करू,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांना दिला आहे.